Goa : water problem in Siolim Dainik Gomantak
गोवा

पाण्यासाठी धावाधाव, अनियमित पुरवठ्याच्या नळावरच शिवोलीकरांची भिस्त

शिवोलीत जुन्या विहिरींना डागडुजीची प्रतीक्षा, पंचायतीचंही दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

म्हापसा : पाण्याची समस्या तशी सबंध राज्यभरातच आहे, परंतु शिवोलीसारख्या ग्रामीण भागातील विहिरी स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे संपूर्णत: बुजल्याने सध्या याभागातील रहिवाशांवर केवळ नळाच्या पाण्यावर विसंबून राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, नळाच्या पाण्यानेही मध्येच दडी मारल्यास लोकांची पाण्यासाठी मोठी धावाधाव होत असल्याचे दिसते. तसेच याभागातील विहिरींची दुरुस्ती व्हावी, यासाठी स्थानिक रहिवाशांनी आता पंचायत तसेच जलस्त्रोत खात्याची मनधरणी केली आहे. (water problem in Siolim News Updates)

एकट्या शिवोलीतच दहा ते पंधरा जुन्या विहिरी बुजलेल्या असून यापैकी बहुतेक विहिरी खासगी मालकीच्या आहेत. मार्ना शिवोलीच्या (Siolim) आठवडी बाजारात असलेली एकमेव सार्वजनिक विहीर ही 130 वर्षे जुनी विहीर असून स्थानिक चर्च मालमत्ते(फाब्रिका )च्या अखत्यारीत आहे. गेली दहा वर्षे येथील विहिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने ही विहीर सध्या डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. मार्नाच्या आठवडी बाजारात मध्यभागी असलेल्या या विहिरीमुळे परिसरात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करुन फिरणाऱ्या मद्यपींच्या तसेच मोकाट गुरांच्या जीवाला धोका आहे.

दरम्यान, या विहिरीची तात्काळ दुरुस्ती व्हावी, यासाठी स्थानिक बाजारकर मंडळाकडून अनेकदा स्थानिक पंचायतीला मागणी करण्यात आले. परंतु फाब्रिकाचा ना हरकत दाखला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत येथील विहिरीची दुरुस्ती शक्य नसल्याचे पंचायत मंडळाने सांगितल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली आहे.

दरवर्षी पाण्यासाठी (Water) वणवण करणाऱ्या येथील लोकांना सध्या नळाच्या अनियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर विसंबून राहावे लागते. यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी अनेकदा मोर्चे तसेच आंदोलने (Protest) करणे भाग पडल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. पंचक्रोशीतील बुजलेल्या विहिरी दुरुस्त केल्यास भविष्यात नळाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. ही बाब आपण पंचायत मंडळाच्या वतीने सरकार दरबारी कळवणार असल्याचं पंचायत सदस्यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT