Baby Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नवजात अर्भकाचे आढळले फक्त पाय, शरीर गायब; डोंगरी-मंडूर परिसरात खळबळ

Goa Crime News: नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज.

Pramod Yadav

Goa Crime News

आगशी येथील डोंगरी-मंडूर परिसरात नवजात बालकाचे फक्त पाय आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. शनिवारी (दि.15) संध्याकाळी सात वाजता मानशी भागात हा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे अर्भकाचे इतर शरीर गायब असून, अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानशी भागात सर्वप्रथम एका महिलेला नवजात बालकाचे केवळ पाय दिसले, महिलेने याबाबत स्थानिक पंचांना माहिती दिली. पंच फ्रान्सिस्को पो यांनी आगशी पोलिसांनी सदर घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. अर्भकाचे पाय येथे कसे व कुठून आले याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. कुत्र्यांनी हे पाय आणले असावे असा देखील एक अंदाज लावला जात आहे.

नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे कृत्य केले असावे. त्यानंतर कुत्र्यांनी बालकाचे पाय उकरुन काढले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT