Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: येत्या काही तासांत राज्यात वादळासह हलक्या पावसाची शक्यता

गोवा वेधशाळेने वर्तवला अंदाज

दैनिक गोमन्तक

राज्यात काही दिवस पावसाने थांबा घेतला आहे. सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी पावसाने हजेरी लावल्याचे नोंदीत नाही. असे असले तरी वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3-4 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

(Light to Moderate Thunderstorms and rain are likely to Goa )

गोवा वेधशाळेने आज दिनांक 01 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता माहिती दिली आहे. की, पुढील 3 ते 4 तासांत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाची गडगडाटी वादळे आणि कमी तीव्रतेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी 40 km प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचे ही म्हटले असून, नागरिकांनी सर्तक राहणे आवश्यक आहे.

वर्तवलेल्या अंदाजानुसार साधारण: पेडणे, बार्देश, डिचोली आदी तालुक्यांमध्ये ढग वेगाने वाहणार आहेत. त्यामूळे या तालुक्यातील नागरिकांनी ही सतर्क राहणे आवश्यक आहे. याबरोबर इतर तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचं वेधशाळेने म्हटले आहे. नागरिकांनी गडगडाटी वादळे होत असताना खुल्या भागात आणि शेतामध्ये काम टाळणे आवश्यक आहे.

खुल्या भागात आणि शेतात काम करत असताना विज कोसळल्यास मोठ्या हाणीची शक्यता आहे. त्यामूळे शेतकरी वर्गानेही सतर्क राहात ज्यावेळी पाऊस आणि वारे वेगाने वाहत असतील अशा वेळी उंच झाडे आणि संरचनेखाली थांबा घेणे टाळावे असा सल्ला ही वेधशाळेने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT