Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates: राज्यात आज, उद्या पावसाची शक्यता

गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात घट झाली असली तरी उकाडा वाढल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात घट झाली असली तरी उकाडा वाढल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. काल पणजी येथे कमाल 33.5 अंश तर किमान 25.6 अंश तापमानाची नोंद झाली, तर मडगाव येथे किमान 33.8 अंश तर किमान 26.3 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस तापमानात कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. त्यानंतर एक-दोन अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे.

त्यानंतर राज्यात हळूहळू तापमान कमी होण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चालू आठवड्यात 21 आणि 22 मार्च रोजी हवामान खात्याने राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT