Manohar Parrikar | EX-Chief Minister Late Manohar Parrikar | Manohar Parrikar News Dainik Gomantak
गोवा

Manohar Parrikar: भाई! IIT शिक्षित देशातील पहिले आमदार, VIP सुविधा धुडकावून साधेपणा जपणारे व्यक्तीमत्व

मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता.

Pramod Yadav

Goa: गोव्याचे चारवेळा मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले राजकारणातील एक उच्च शिक्षित व्यक्तीमत्व म्हणून मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची ओळख आहे. 17 मार्च 2019 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ नेहमीच लक्षात राहणारा आहे. त्याच्याच नेतृत्वात पाकिस्तानवर केलेला ऐतिसाहसिक सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) भारत कधीच विसणार आहे. आज मनोहर पर्रीकर यांची जयंती साजरी होत आहे.

मनोहर पर्रीकर यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये गोव्यातील म्हापसा येथे झाला. मराठी भाषेतून माध्यमिक शिक्षण घेतलेले पर्रीकर यांनी 1978 साली आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आयआयटी(IIT) शिक्षित मनोहर पर्रीकर हे भारतातील पहिले आमदार आहेत. मनोहर पर्रीकर यांनी सुरुवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलं.

विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री

मनोहर पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षातून (BJP) आपल्या राजकारणाला सुरूवात केली. 1994 साली पहिल्यांदा पर्रीकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

चारवेळा मुख्यमंत्री पण एकदाही कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत

मनोहर पर्रिकर 24 ऑक्टोबर 2000 रोजी पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. 2002 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यावेळीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च 2012 मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, यावेळी 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आलं आणि पर्रिकरांना संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दोन वर्षांपूर्वी मार्च 2017 ला ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर चारवेळा मुख्यमंत्री पण एकदाही कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत

संरक्षण मंत्रीपदाचा ऐतिसाहसिक कार्यकाळ

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक यावेळी संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे मनोहर पर्रीकर यांच्याकडे होती. 28-29 सप्टेंबर 2016 च्या रात्री भारताने पाकिस्तामध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले होते. पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या हल्ल्याची जगाने दखल घेतली होती.

अनेक वर्षांपासून रखडलेली ‘वन रँक वन पेन्शन योजना’ देखील मनोहर पर्रीकर यांच्याच कार्यकाळात लागू करण्यात आली. याचा जवळपास 21 लाख माजी सैनिकांना लाभ मिळाला होता. एवढेच नव्हे तर, देशभरात गाजत असलेला ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळ्याची चौकशी त्यांनीच सुरु केली.

VIP सुविधा धुडकावून साधेपणा जपणारे व्यक्तीमत्व

चारवेळा मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेले मनोहर पर्रीकर यांनी व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व सुख-सुविधा नाकारल्या, एवढेच नव्हे तर त्यांनी शासकीय घरालाही देखील नम्रपणे नकार दिला. विधानसभेत जाण्यासाठी देखील ते स्कूटरचा वापर करायचे. विमानाचा प्रवास देखील त्यांनी इकॉनॉमी क्लासमधून करायचे. अनेकदा त्यांना रस्त्याशेजारी टपरीवर चहा पितानाही बघितलं गेलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT