Due to rain Power Cut in Goa  Dainik Gomantak
गोवा

दोन दिवस कोसळत असलेल्या संततधारेमुळे फोंड्यात जनजीवन विस्कळीत

Due to rain Power Cut in Goa : फोंड्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या संततधारेमुळे लोकांची धांदल उडाली.

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंड्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या संततधारेमुळे लोकांची धांदल उडाली. अवकाळी पावसाच्या दणक्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, काल गुरुवार व आज शुक्रवारी दोन दिवस संततधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली. त्यात बेतोडा येथील प्रमोद गावकर यांच्या घराच्या एका बाजूला माड पडून सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले.

फोंड्यातील बेतोडा, निरंकाल, उसगाव, बोरी, प्रियोळ, खांडेपार व इतर ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळली. फोंडा तसेच कुंडई अग्निशामक दल व स्थानिकांनी रस्त्यावरील झाडे हटवली. संततधार पावसामुळे शेतजमिनी तसेच नाले पाण्याने भरले.

मे महिना असल्याने काही लोकांनी घरे शाकारणीसाठी घेतली होती, मात्र संततधार कोसळत असल्याने घरे शाकारणीच्या कामात अडथळे आले. शुक्रवारी तर फोंडा तालुक्यातील अनेक मंडपांत लग्न सोहळे होते. पावसाने या सोहळ्यांवर विरजण टाकले. लग्नमंडप पावसामुळे भिजून गेल्याने वरातींची अडचण झाली.

काही ठिकाणी जोरदार वारे तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट असा प्रकार रात्रीच्यावेळी दिसला. त्याशिवाय फोंडा तालुक्यात वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामळे लोकांची गैरसोय झाली.

फोंडा शहरात दोन तास वीज गूल

फोंडा शहर परिसरात सकाळी दोन तास वीज गूल झाली. फोंड्यातील शहर परिसरातील मुख्य भागात सारस्वत बँकेजवळील वीजवाहिन्या लोंबकळू लागल्याने धोका निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या ओढल्या तरी एका बाजूला कलंडलेला वीज खांब धोकादायक स्थितीत आहे. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या पुन्हा ओढण्यासाठी शहर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तो तब्बल दोन तासांनी सुरळीत झाला. दरम्यान, फोंडा तालुक्यात अधूनमधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच असून रात्रीच्यावेळी वीज गायब होत असल्याने लोकांची अतिशय गैरसोय होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT