Voting in Bicholim | Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : डिचोलीत मतदारांची मतदानाकडे पाठ; उमेदवार चिंतेत

डिचोली तालुक्यातील 17 पंचायतींसाठी निवडणूक होत आहे.

तुकाराम सावंत

Goa Panchayat Election : पंचायत निवडणुकीच्या मतदानास सुरुवात झाली असून, डिचोली तालुक्यातील काही मतदान केंद्रावर सकाळी सुरवातीचा एक तास प्रतिसाद 'थंडा' असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूने आकाशात ढग दाटून असल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. डिचोली तालुक्यातील 17 पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यातील अडवलपाल, साळ, मेणकूरे-धुमासे, लाटंबार्से, मुळगाव, शिरगाव, पिळगाव, नार्वे, वन-म्हावळींगे, कारापूर-सर्वण,मये-वायंगिणी, आमोणे, कुडणे, न्हावेली, सूर्ल, वेळगे आणि पाळी-कोठंबी या पंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.

50 हजार 824 मतदार

डिचोली तालुक्यातील सर्व पंचायतींत मिळून 82 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच याप्रमाणे 410 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यात 22 हजार 436 पुरुष तर 28 हजार 388 महिला मतदार मिळून 50 हजार 824 मतदारांना मतदानाचा हक्क आहे.

राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी बुधवारी सकाळी 8 ते सायंकाळ 5 पर्यंत मतदान होत आहे. यासाठी तब्बल 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहे. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहोचले आहे.

निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी), आप पुन्हा सक्रिय झाले असले भाजपने आपले मंत्री, आमदार आणि समर्थकांना सर्व प्रकारची रसद पुरवल्याची माहिती आहे. राजकीय पक्षांना स्थानिक नेटवर्क घट्ट करण्याचे ही आयती संधी आल्याने ते पुढे सरसावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT