CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Labour Welfare Goa: कामगार कल्याण मंडळात फक्त 6661 कामगारांची नोंद! CM सावंतांच्या बैठकीत उघड; उद्योगांच्या नोंदणीचे निर्देश

Goa Labour Board: राज्यातील हजारो कामगारांपैकी केवळ ६,६६१ कामगारच राज्य कामगार कल्याण मंडळाशी नोंदणीकृत असल्याची धक्कादायक बाब मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समोर आली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील हजारो कामगारांपैकी केवळ ६,६६१ कामगारच राज्य कामगार कल्याण मंडळाशी नोंदणीकृत असल्याची धक्कादायक बाब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समोर आली. तसेच सुमारे साडेतीन हजार उद्योग आस्थापने या मंडळाकडे नोंद आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सर्व कामगार व उद्योग आस्थापनांनी कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत रोजगार पुरवणाऱ्यांकडून १० रुपये, कामगारांकडून ३० रुपये आणि सरकारकडून २० रुपये अशा प्रमाणात योगदान स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

कामगार आयुक्त डॉ. लेविनसन मार्टिन्स यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत “कामगार कल्याण योजनांचा लाभ प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहोचायला हवा, त्यासाठी नोंदणी ही पहिली पायरी आहे,” असे सांगितले. कामगारांची नोंदणी अधिक गतीने व्हावी यासाठी सर्व संबंधित विभाग व उद्योग संस्थांना सजग भूमिका बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. मात्र, प्रत्यक्षात फारच थोडे कामगार या योजनेच्या कक्षेत आहेत. कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी सरकारने त्रिसूत्री योगदान पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, अपघात विमा, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, महिलांसाठी प्रसूती साहाय्यता, निवास सुविधा यांसारख्या योजना राबवता येणार आहेत. नोंदणीकृत कामगारांचे संख्याबळ वाढले, तर अधिक व्यापक व सशक्त कल्याण धोरणे प्रभावीपणे अमलात आणता येणार आहेत.

कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना

शैक्षणिक सहाय्यता योजना – कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती व शुल्क परतावा

आरोग्य सुविधा – औषधे, तपासण्या, अपघात विमा आणि आरोग्य शिबिरे

गर्भवती कामगारांसाठी साहाय्यता

स्वतःचे घर बांधण्यासाठी कर्ज अथवा मदत

कामगार विश्रामगृहे आणि मनोरंजन सुविधा

प्रशिक्षण व कौशल्यवृद्धी कार्यशाळा

कामगारांना होणारे थेट फायदे

आर्थिक गरजांवेळी अनुदान किंवा सवलतीचा लाभ

मुलांच्या शिक्षणात आर्थिक मदत

अपघात किंवा आजारावरील वैद्यकीय मदत

निवृत्तीनंतर किंवा आकस्मिक आपत्तीनंतर कुटुंबासाठी सामाजिक सुरक्षा

कल्याणकारी योजना व प्रशिक्षणाद्वारे कौशल्यवृद्धी

काय आहे कामगार कल्याण मंडळ?

राज्य कामगार कल्याण मंडळ हे राज्य सरकारच्या अधिपत्याखालील एक अधिकृत संस्था असून नोंदणीकृत कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना राबवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. उद्योग आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या असंघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनांचा लाभ मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT