Leopard terror in Agonda Dainik Gomantak
गोवा

आगोंदमध्ये बिबट्यांचा वाढला वावर

स्थानिकांमध्ये घबराट: त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

आगोंद: आगोंद पंचायत क्षेत्रातील बेतुल आणि भायलेमळ या ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून सध्या येथील पाळीव प्राण्यांवर संक्रांत आली आहे. जरासा अंधार होता क्षणीच बिबटे येथील पाळीव प्राण्यांना शिकार बनवत आहेत. अशा घटनांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी वन खात्याकडे करण्यात येत आहे.

बेतुल याठिकाणी एका स्थानिक रहिवाशाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मुक्त संचार करत असलेल्या बिबट्यांना टिपले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राणी गायब होण्याचे प्रकार वाढल्यानंतर काही स्थानिकांनी पाळीव कुत्रे घरामध्ये किंवा घराबाहेर लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले जात आहे.

याआधीच वन खात्याकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. मात्र अद्याप पिंजरा लावला नसल्याची माहिती स्थानिकांकडून उपलब्ध झाली. पुढील दोन दिवसांत येथे पिंजरा लावण्यात येईल, अशीही माहिती मिळाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटना उघडकीस

अशाच एका घराबाहेर एका बंदिस्त पिंजऱ्यात असलेल्या कुत्र्यावर झडप घालून त्याला शिकार बनवण्यासाठी दोन बिबटे तुटून पडले. मात्र, कुत्र्याच्या ओरडण्याने तसेच तो पिंजरा लोखंडी असल्यामुळे वाघांना माघारी परतावे लागले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली आहे. गावात मुक्त संचार करणारे बिबटे पाहून स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काजू काढणाऱ्यांवर टांगती तलवार

सध्या काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही बिबट्याच्या संचारामुळे काजू बागायतीत फिरताना खूप काळजी घ्यावी लागते, अशी माहिती पारवे येथील शांता वेळीप यांनी दिली. सध्याच्या घडीला पर्यावरण संतुलनाचे भान न राखता वृक्षतोड केली जात आहे. बेकायदेशीररित्या चाललेल्या कामांची दखल घेतली जात नाही. परिणामी जंगल कमी झाल्यामुळे वन्य प्राणी पोटाची भूक शमविण्यासाठी जवळच्या गावांत शिरतात. अनेक वेळा रेल्वेखाली आल्यामुळे, खुल्या विहिरी पडल्यामुळे या वन्य जीवांवर संकट येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT