Goa Leopard Rescued  Dainik Gomantak
गोवा

Goa Leopard : भक्ष्य शोधत आला अन् विहिरीत पडला; गावात एकच खळबळ

शिरसोडे-सत्तरी येथे बिबट्याला जीवदान : बोंडलात रवानगी

दैनिक गोमन्तक डिजिटल

शिरसोडे-सत्तरी येथे भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबटा रात्री विहिरीत पडला. या बिबट्याला शुक्रवारी सकाळी वन खात्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जीवदान दिले. बिबटा विहिरीत पडल्याचे वृत्त समजल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी संध्याकाळी त्याला बोंडला अभयारण्यात सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हादई अभयारण्याजवळील शिरसोडे गावात पहाटेच्या सुमारास नर जातीचा बिबटा भक्ष्याच्या शोधात आला. दयानंद गावकर यांच्या घराशेजारील विहिरीत तो पडला. सकाळी दयानंद गावकर यांनी वन खात्याला या प्रकाराची माहिती दिली.

म्हादई अभयारण्यातील वन कर्मचारी तसेच अधिकारी गौरीश बैलुंडकर आणि वाळपई वन खात्याचे आरएफओ श्यामसुंदर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांच्या मदतीने अथक परिश्रमानंतर बिबट्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT