Goa News | Leopard Dainik Gomantak
गोवा

Goa University : विद्यापीठाने घेतला बिबट्याचा धसका; विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा

कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाच्या आवारात फिरताना दक्षता घ्यावी, अशी सूचना गोवा विद्यापीठाच्या निबंधकांनी जारी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी बांबोळी येथील पठारावर बिबट्याचे दर्शन घडल्याने गोवा विद्यापीठाने त्याची गंभीर दखल घेत संध्याकाळी 6.30 ते पहाटे 7.30 वाजेपर्यंत एकट्याने तेथील कँपसमधील रहिवाशांनी फिरू नये, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाच्या आवारात फिरताना दक्षता घ्यावी, अशी सूचना गोवा विद्यापीठाच्या निबंधकांनी जारी केली आहे.

विद्यापीठाचा बराचसा भाग निर्जन आहे. तेथे झाडांची दाटी असल्याने हा बिबट्या तेथे वावरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहाटेच्या वेळीही काही लोक जॉगिंग करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी जातात. त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. बांबोळी येथील आकाशवाणी हॉलिडे होमजवळच्या एका झाडावर बिबट्या बसलेला तेथील एका दाम्पत्याला दिसला होता. त्यांनी ही माहिती उजेडात आणली होती.

बांबोळी पठारावर बरेचसे वन्य प्राणी दिसतात. विद्यापीठाच्या आवारात तर अनेक मोर वस्तीला आहेत. परंतु, रविवारी संध्याकाळी तेथे आकाशवाणी हॉलिडे होमच्या अगदी निकट एका झाडावर तेथील स्वयंपाकी दाम्‍पत्‍याने बिबट्याचे दर्शन घेतले. त्यामुळे त्‍यांची घाबरगुंडी उडाली.

आकाशवाणी हॉलिडे होममधील स्वयंपाक करणाऱ्या दाम्‍पत्‍यासह तेथे वास्तव्‍य करणाऱ्या एका पाहुण्यानेही या बिबट्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आरडा-ओरडा झाल्याने बिबट्या तेथून पसार झाला. विद्यापीठाच्या संकुलात गेली किमान दहा वर्षे मोरांचे दर्शन होत आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मोकळ्या मैदानात अनेक मोर सहज दृष्टीस पडतात. त्यांचा आवाज विद्यार्थ्यांना सतत ऐकू येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT