Lemon-Dou|Coca Cola India Dainik Gomantak
गोवा

Coca Cola India चे मद्य क्षेत्रात पाऊल; गोवा आणि महाराष्ट्रात सुरू केली Lemon-Dou ची विक्री

2018 मध्ये लॉन्च केलेले, Lemon-Dou हे कोका-कोलाचे पहिले रेडी-टू-ड्रिंक अल्कोहोल पेय होते. कोका-कोलाला "पूर्णपण शितपेय कंपनी" म्हणून स्थान देण्यासाठी हे उत्पादन सादर करण्यात आले आहे.

Ashutosh Masgaunde

Lemon-Dou, a ready-to-drink alcoholic beverage has started pilot testing in parts of Goa and Maharashtra:

कोका-कोला इंडिया मद्य उत्पादन क्षेत्रात आपेले पहिले पाऊल टाकले आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विकले जाणारे रेडी-टू-ड्रिंक अल्कोहोल पेय Lemon-Dou याची गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू केली आहे.

ईकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी भारतातील काही राज्यांमध्ये Lemon-Dou ची चाचणी घेत आहे.

Lemon-Dou हे शोचूचे मिश्रण आहे यामध्ये ब्रँडी, वोडका आणि लिंबासारख्या डिस्टिल्ड मद्याचा समावेश असणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

याविषयी तपशीलवार माहिती देताना, कंपनीने सांगितले की, "या शीतपेयेची तयारी आणि वितरण स्वतंत्रपणे भारतातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन केले जाणार आहे."

Lemon-Dou हे अल्कोहोलिक कॉकटेल आहे जे पहिल्यांदा जपानमध्ये लाँच केले गेले होते. दरम्यान गोवा आणि महाराष्ट्रात चाचणीसाठी उपलब्ध केलेल्या, 250 मिली Lemon-Dou च्या कॅनसाठी पेयाची किंमत 230 रुपये ठेवण्यात आली आहे.

कोका-कोला ग्लोबलचे मार्केटिंग प्रमुख, मॅनोलो अरोयो यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, "अल्कोहोल ही खूप मोठी श्रेणी आहे आणि आम्ही जाणूनबुजून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे."

2018 मध्ये लॉन्च केलेले, Lemon-Dou हे कोका-कोलाचे पहिले रेडी-टू-ड्रिंक अल्कोहोल पेय होते. कोका-कोलाला "पूर्णपण पेय कंपनी" म्हणून स्थान देण्यासाठी हे उत्पादन सादर करण्यात आले.

कोका-कोला ही भारतातील सर्वात मोठी शीतपेय कंपनी आहे, जी कोक, स्प्राइट, थम्स अप, फंटा, लिम्का फिजी ड्रिंक्स, माझा आणि मिनिट ज्यूस विकते.

या व्यतिरिक्त, कंपनी किन्ले वॉटर, ऑनेस्ट चहा आणि कॉफी ब्रँड जॉर्जिया आणि कोस्टा कॉफी देखील विकते.

ऑक्टोबरमध्ये, कोका-कोला आणि स्पिरीट्स निर्माता पेर्नोड रिकार्ड यांनी अॅब्सोल्युट वोडका आणि स्प्राईट हे पेय-मिश्रित कॉकटेल म्हणून तयार करण्यासाठी जागतिक सहकार्याची घोषणा केली.

2024 मध्ये कॉकटेल बाजारात येण्याची अपेक्षा आहे. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, उत्पादन यूके, नेदरलँड्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये विकले जाईल.

भारतात अल्कोहोल हा एक जटिल वितरण आणि उत्पादन व्यवसाय असल्याने, Coca-Cola हळूहळू बाजारपेठेत प्रवेश करेल, असे कंपनीच्या योजनांची माहिती असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले.

याशिवाय, स्पिरिट्स हे भारतातील एक अत्यंत नियमन केलेले आणि जास्त कर आकारलेले क्षेत्र आहे, ज्याची किंमत वैयक्तिक राज्यांद्वारे नियंत्रित केली जाते.

जपान आणि आता भारताव्यतिरिक्त, चीन आणि फिलीपिन्स सारख्या निवडक देशांमध्ये Lemon-Dou उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT