Goa News| CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी 'शिका आणि कमवा' योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

G20च्या गोव्यात 8 सभा होणार

Rajat Sawant

CM Pramod Sawant : सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवा (शिकताना कमवा) ही योजना जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये या योजनेचे लाँच करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

युवा उद्योजक अथवा वाहतूक उद्योजक योजना लवकरच सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली होती. गोवा माईल्सकडून युवकांना टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

योजनेबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, "सरकार एप्रिलमध्ये "शिका आणि कमवा (शिकताना कमवा)" योजना लाँच करणार आहे. सूर्य, वाळू आणि समुद्र यांच्याशी निगडीत कौशल्यावर सरकारला भर द्यायचा आहे."

"भारत G20 बैठकांचे आयोजन करत आहे. G20च्या गोव्यात 8 सभा होणार आहेत. यानिमित्ताने गोमंतकीयांना हस्तकलेचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे. डाळ आणि इतर कृषी उत्पादनांसह भेटवस्तू म्हणून हस्तकलेचे कौशल्य दाखवण्याची गोमंतकीयांसाठी ही एक संधी आहे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

काल वाहतूकमंत्र्यांनी युवा उद्योजक अथवा वाहतूक उद्योजक योजना लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच ही योजना बेरोजगारांसाठी सुरू केली आहे. त्याची तयारी झाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उद्‍घाटन केले जाईल असेही सांगितले.

या टॅक्सी ॲप सेवेसाठी युवकांना कोणतीच रक्कम वा डाऊन पेमेंट गुंतवावे लागणार नाही. गोवा माईल्स युवकांना स्वतःचे भांडवल वापरून टॅक्सी उपलब्ध करून देणार आहे. ही योजना ॲप आधारित आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT