Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीत "ऑल इज नॉट व्हेल" : युरी आलेमाव

राज्याचे महसूल नुकसान थांबवण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला लागून केलेल्या विहीरीचे गूढ बांधकाम कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत "ऑल इज नॉट व्हेल’ असल्याचेच स्पष्ट करते. वायू आणि जल प्रदूषण, खाजगी मालमत्ता तसेच सरकारी जमिनींवर औद्योगिक आस्थापनांकडून बेकायदेशीर अतिक्रमण अशी अनेक प्रकरणांनी सदर औद्योगीक वसाहत ग्रासली आहे.

प्राणघातक प्रदूषण, बेकायदा अतीउत्पादन उत्पादन आणि जीएसटीची चोरी तसेच बेकायदेशीर अतिक्रमणांसह राज्याचे महसूल नुकसान थांबवण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

"विहिरीच्या बेकायदेशीर बांधकामाशी संबंधित अज्ञात व्यक्तींना कुंकळ्ळी नगर पालीकेने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसवर प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव म्हणाले की सदर औद्योगीक वसाहतीतील सर्व बेकायदेशीर गोष्टी थांबविण्याची गरज आहे आणि कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे."

"मागील विधानसभेच्या अधिवेशनात कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीसंबंधी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खास पथक पाठवून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील काही आस्थापनांकडून होणारे प्रदूषण, अतिउत्पादन, कर चुकवेगिरी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते."

"अधिवेशनानंतर खरोखरच काही कारवाई झाली की नाही हे पाहण्यासाठी आता आगामी विधानसभा सत्रात तारांकीत प्रश्न मांडले आहेत," असे युरी आलेमाव म्हणाले.

"कुंकळ्ळी औद्योगीक वसाहत म्हणजे "टिकिंग बॉम्ब" असून कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होऊ शकतो. पिळर्ण औद्योगीक वसाहतीत लागलेल्या आगीपासून सरकारने धडा घेतला पाहिजे आणि अपघातांचे मुख्य कारण असलेल्या बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलली पाहिजेत," असे युरी आलेमाव म्हणाले.

मी कधीही कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करणार नाही. माझे ठाम मत आहे की कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सर्व प्रदूषणकारी कारखाने तात्काळ बंद करण्यात यावेत आणि पर्यावरणपूरक उद्योग आणले जावेत," असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT