CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुनरुच्चार; विरोध करणाऱ्यांना मागे हटण्याचाही दिला सल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात करणार असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी सांगे आयआयटीला विरोध करणाऱ्यांचाही पुरता समाचार घेतला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज सांगेतील पाईक देव देवस्थानाच्या नवीन मंदिराची पायाभरणी केली. यावेळी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि मंत्री सुभाष फळदेसाईही उपस्थित होते. येत्या सहा महिन्याच्या आत आयआयटीचीही पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. या प्रस्तावित आयआयटी तसेच गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात लोकांना सरकारी जमीन हडपण्याची सवय लागली आहे. जर एखाद्याने सरकारी जागेवर घर बांधलं असेल आणि बरीच वर्ष राहात असेल तर सरकार म्हणून आम्ही त्याला ती जागा देण्यास तयार आहोत. एखाद्याचं घर मुद्दामहून मोडून त्याजागी प्रकल्प आणणार नाही. उलट त्याला सरकार जेवढ्यास तेवढी जमीन देण्यासही तयार आहे. मात्र परिसरात चुकीचा संदेश पसरवत तेढ निर्माण करणं चुकीचं आहे. जर या जागेत एखादं कोपेल असेल तर तेही ख्रिस्ती बांधवांना सन्मानपूर्वक दिलं जाईल. या प्रकल्पाचं राजकारण होऊ नये यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा आणि आयआयटीचा मार्ग मोकळा करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT