Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'पोलिसांनी आधी सत्य शोधावे'; हरमल पंचक्रोशीच्या तक्रारीवरून पार्सेकर-आरोलकर आमनेसामने

Goa Police Investigation: पोलिसांनी तक्रारीचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी पार्सेकर यांनी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेसंबंधी मांद्रे पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीवरून संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी पार्सेकर यांनी केली आहे.

तर, संबंधित तक्रार दाखल होण्यात किंवा पोलिसांच्या कार्यवाहीत आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचे आरोलकर यांनी स्पष्ट केले. हरमल पंचक्रोशी संस्थेच्या कॉलेज इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत पार्सेकर बोलत होते. एप्रिलमध्ये घडल्याचे सांगितल्या जाणाऱ्या घटनेचा पोलिसांनी आधी पंचनामा करून त्यानंतर गुन्हा नोंदविणे आवश्यक होते. मात्र, पंचनामा न करताच गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तक्रारीतील आरोप, संबंधित ठिकाण आणि कथित घटनेबाबत पोलिसांनी स्पष्टता आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित महिला डिसेंबरमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी आली होती. तिला चालू शैक्षणिक वर्षानंतर प्रवेश घेण्यास सांगितले होते. शिक्षण खात्याची मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश देण्याबाबत मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यास सांगितले होते, असे पार्सेकर यांनी सांगितले. १९ ऑक्टोबर रोजीही संबंधित महिला शाळेत आली होती. तिने मुलांच्या प्रगतीबाबत बोलण्याची इच्छा व्यक्त केल्याने आपण तिला मुख्याध्यापकांना भेटण्यास सांगितले, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरोलकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. तुये येथील एक महिला आपल्याकडे रडत आली होती आणि तिने शिक्षण संस्थेतील कथित प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर तिने स्वतः मांद्रे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. महिलेने आपली व्यथा मांडली म्हणजे तक्रारीमागे आपला हात आहे, असा अर्थ होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेची होतेय बदनामी!

या प्रकरणामुळे संस्थेची बदनामी होत असल्याबद्दल लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नाराजी व्यक्त केली. ही संस्था सामाजिक कार्यासाठी असून, राजकीय विरोधकांनी अपरिपक्वता दाखवू नये, असे ते म्हणाले. पोलिसांवर दबाव असल्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला शिक्षण खात्याकडून फाइव्ह स्टार रेटिंग मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ नेत्यांचा आदरच : जीत

तक्रारीत तथ्य आहे की नाही, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होईल. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही विनाकारण आरोप करू नयेत, असे आवाहन आमदार जीत आरोलकर यांनी केले. ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा आपण अवमान केलेला नाही आणि त्यांचे सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे, असे सांगतानाच नागरिकांवरील अन्याय सहन करणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांनी अपप्रचार करण्याऐवजी मांद्रे मतदारसंघाच्या विकासाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Real Estate Dispute: कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर सहन करणार नाही! हायकोर्टाचा प्रकाश अग्रवाल यांना मोठा दणका; ठोठावला 'इतक्या' हजारांचा दंड

Codli Mine Block: कोडली खाण सुरू करण्याचे स्थानिकांकडून स्वागत; 'रोजगार द्या, पर्यावरणही जपा!'

Tibet Earthquake: तिबेटमध्ये विनाशकारी भूकंप! 16 जणांचा मृत्यू, 340 हून अधिक घरे जमीनदोस्त; रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी VIDEO

Land Conservation: गोव्यात आणखी 12.96 लाख चौरस मीटर जमीन 'नो-डेव्हलपमेंट झोन'मध्ये; सात तालुक्यांचा समावेश

IND vs NZ: ईशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-20 मधून बाहेर; वैभव सूर्यवंशीला मिळणार संधी, न्यूझीलंडविरुद्ध 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT