Judge Prakash Naik Dainik Gomantak
गोवा

आपला मुद्दा न्‍यायाधीशांसमोर प्रभावीपणे मांडणे हेच वकिलांचे खरे कौशल्‍य: न्‍या. प्रकाश नाईक

फक्‍त कायद्याचीच नव्‍हे तर इतर क्षेत्राचीही माहिती मिळवणे गरजेचे

सुशांत कुंकळयेकर

आपला मुद्दा प्रभावीपणे न्‍यायाधीशांसमोर मांडणे हेच फौजदारी वकिलांसाठी खरे कौशल्‍य असून किंबहुना आपला मुद्दा न्‍यायाधीशांच्‍या गळी उतरविण्‍याचे कसब वकिलांना जमले पाहिजे. मात्र ही गोष्‍ट शक्‍य होणार्‍यांतली नाही यासाठी वकिलांनी स्‍वत:ची तयारी करण्‍याची गरज असते.

त्‍यांना फक्‍त कायद्याचीच माहिती असून उपयोग नाही. इतर क्षेत्राचीही माहिती ठेवली तरच वकिल न्‍यायालयात चांगली केस मांडू शकतो असे उद्‍गार मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा पीठाचे न्‍यायाधीश प्रकाश नाईक यांनी काढले.

मडगावच्‍या कारे कायदा महाविद्यालयाच्‍या ‘जीआरके- ज्‍युडीशरी टॉक्‍स’ या व्‍याख्‍यानमालेत न्‍या. नाईक यांनी फौजदारी खटल्‍यांचे विविध पैलू या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी विद्या विकास मंडळाचे उपाध्‍यक्ष प्रितम मोरायस, कार्यकारी मंडळाचे सदस्‍य प्रसाद नाईक तसेच कारे महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्य मारिया गोरेटी सिमोईश हे व्‍यासपीठावर उपस्‍थित होते.

एक चांगला वकील बनण्‍यासाठी फक्‍त कायद्याचेच शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्‍याला इतर क्षेत्रांबद्दलही माहिती असण्‍याची गरज आहे. ही माहिती मिळविण्‍यासाठी वकिलांनी इतर बाबींचीही माहिती वाचून स्‍वत:ला परिपूर्ण केले पाहिजे.

सर्वांत महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे, मला कायद्यांतले सगळे काही समजते या भ्रमात न रहाता प्रत्‍येक नवीन गोष्‍ट शिकण्‍याकडे त्‍याचा कल असण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कायद्याच्‍या विद्यार्‍थ्‍यांना संबोधित करताना न्‍या. नाईक म्‍हणाले, आपल्‍या अशिलाचे म्‍हणणे प्रभावीपणे मांडण्‍यासाठी वकिलांनी धडपड केलीच पाहिजे. त्‍यासाठी कित्‍येकवेळा वकील आक्रमक भूमिकाही स्‍वीकारतात. काही बाबतीत अशी भूमिका घेणे ठीक असले तरीही वकील हा शांतपणे ऐकणारा असला पाहिजे.

उलट तपासणी घेताना आपला युक्‍तीवाद कुठे थांबवावा याची अचूक जाण असलेला वकीलच प्रभावी कामगिरी करु शकतो असे ते म्‍हणाले. मात्र यासाठी नवशिक्‍या वकिलांनी ज्‍येष्‍ठ वकिलांच्‍या हाताखाली काम करून अनुभव घेणे गरजेचे आहे.

कुठलाही वकील फौजदारी खटले लढवत असला तरी त्‍याला संविधानिक कायद्याचे ज्ञान असणे आवश्‍‍यक आहे, कारण संविधानिक कायदाच सगळ्‍या कायद्याचा मूलमंत्र असतो असे ते म्‍हणाले.

सुरुवातीला प्रीतम मोराईस यांनी स्‍वागत केले. तर गोरेटी सिमाेईस यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. आकांक्षा गेहलोत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT