Lavu Mamledar Joins Congress Dainik Gomantak
गोवा

मला रोखण्यासाठीच मगोची युती : मामलेदार

काँग्रेस प्रवेशानंतर लवू मामलेदार यांनी केला सनसनाटी आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : तृणमूल काँग्रेसला हल्लीच रामराम ठोकून त्‍या पक्षातून बाहेर पडलेले लवू मामलेदार यांनी आज काँग्रेसशी ‘हात’मिळवणी केली. काँग्रेसने मडकईतून उमेदवारी दिली तरच निवडणूक लढवणार, अन्‍य मतदारसंघात आपण इच्छुक नाही. मडकईत मला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळू नये म्हणून मगोने त्या पक्षाशी च्याशीयुती करून माझा मार्ग अडविला, असा आरोप लवू मामलेदार यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर केला. (Lavu Mamledar Joins Congress News Updates)

पणजीत काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मामलेदार यांना पक्षात प्रवेश दिला व त्यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी एम. के. शेख उपस्थित हे उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागील प्रतिक्रिया देताना मामलेदार (Lavu Mamledar) म्हणाले की, मला यावेळी मडकईतून निवडणूक लढवायची आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाला जी कंपनी मदत करत आहे ती अनेकांना प्रवेश करण्यासाठी आमिषे दाखवत आहेत. सगळ्यानांच उमेदवारी देण्याची आश्‍वासने दिली जात आहेत. मलाही मडकईतून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र मगोबरोबर तृणमूल काँग्रेसने युती केल्याने मला दिलेले आश्‍वासन पूर्ण करणे शक्य नाही हे कळून चुकले होते.

तृणमूल काँग्रेसतर्फे (TMC) काय बोलायचे व काय नाही हे ‘आयपॅक’ स्क्रिप्ट देत होते. ज्यावेळी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची युती झाली तेव्हा आमदार विजय सरदेसाई यांच्याविरोधात विविध प्रकरणांवर आरोप करण्याचे स्क्रिप्ट दिले होते असा आरोपही मामलेदार यांनी केला.

मला मडकईतून उमेदवारी द्या अशी मागणी करून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. जरी उमेदवारी नाही मिळाली तर काँग्रेसचा (Congress) उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करणार आहे. मला काँग्रेस पक्षावर पूर्ण विश्‍वास आहे. सध्या तृणमूल काँग्रेस हा पक्ष प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ कंपनीच्या तालावर निर्णय घेत आहे. पक्षाच्‍या प्रमुख नेत्यांना यासंदर्भात काहीच माहीत नाही, असे लवू मामलेदार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT