Panaji
Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ठसकेबाज नृत्याविष्काराने आझाद मैदानावर बहरल्या लावण्या; पणजी शिमगोत्सवतर्फे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, शिवरत्न प्रॉडक्शन महाराष्ट्र निर्मित ''तुमच्यासाठी काय पण'' या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाने पणजीतील आझाद मैदान रविवारी भारून गेले. शिट्ट्या, टाळ्या आणि वाहवाची दाद व त्यावर उत्तरोत्तर एका पेक्षा एक बहारदार लावण्यांची नजाकतदार पेशकश यामुळे कार्यक्रमाची रंगत खुलत होती.

पथकातील बालगंधर्व पुरस्कार विजेती नृत्यांगना पूनम कुडाळकर यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सोबत रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर, मृणाल लोणकर, अंजली, श्रद्धा, उर्मिला, सुमती, वर्षा यांनी रंगतदार लावण्यांनी रसिकांना रिझवले. गण, मुद्रा, गौळण याने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात या रावजी, चंद्रा, ववाजले की बारा, ढोलकीच्या तालावर, ढगाला लागली कळ, झाल्या तिन्ही सांजा, पिकल्या पानांचा देठ बाई हिरवा.. अशा लावण्यांनी लज्जत वाढली.

योगेश महाजन यांनी निवेदन केले. व्यासपीठावर पणजी शिग्मोत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, कोषाध्यक्ष संदीप नाईक, कार्यकारी सदस्य किशोर नार्वेकर उपस्थित होते. प्राचार्य शशिकांत सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

तीन कलाकारांचा सत्कार

पणजी शिमगोत्सव समितीतर्फे लावणी कार्यक्रमात नाट्यकलाकर एकनाथ राजाराम परब, दयानंद गणेश राऊत व तियात्र कलाकार माथायश मास्कारेनाज यांचा प्रमुख पाहुणे आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब यांचा शाल,

श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी प्रायोजक राजदीप बिल्डर्सचे मालक राजेश तारकर, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या पणजीच्या व्यवस्थापक सपना पेडणेकर व आल्कोन ग्रुपचे अभियंता अमेय पानवेलकर तसेच पणजी महानगरपालिकेचे मुख्य अभियंता विवेक पार्सेकर यांचा ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT