Vegetable Rate Dainik Gomantak
गोवा

Vegetable Rate: 20 रूपयांना 4 लिंबू, उन्हाच्या झळा वाढल्या; गावठी कैऱ्याची मागणीही वाढली

गोव्यातील तापमानाचा पारा मागील काही दिवसांपासून चढलेलाच आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील तापमानाचा पारा मागील काही दिवसांपासून चढलेलाच आहे. वाढत्या तापमानामुळे आता शीतपेयांकडे लोकांची पाऊले आपोआप वळत आहेत. लिंबू सरबत, लस्सी, कोल्ड ड्रिंक्स आणि विविध थंड पदार्थ घेण्यावर नागरिक भर देत आहेत. याचा बाजारातील लिंबू, कैऱ्या याच्या मागणीवर देखील प्रभाव दिसून येत आहे.

फोंडा बाजारातील दरानुसार, चार लिंबू वीस रूपयांना मिळत असून, पाच कैऱ्यांसाठी पन्नास रूपये मोजावे लागत आहेत.

फोंडा बाजारात भाज्यांचे दर देखील वाढलेलेच दिसून येत आहेत. उकाड्यामुळे काकडी, आले यांची मागणी वाढली आहे. काकडी सध्या चाळीस रूपये किलो दराने विकली जात आहे. तर, आल्याच्या दरात तीस रूपयांनी वाढ झाली असून, त्याची 130 रूपये किलो दराने विक्री होत आहे. याशिवाय मिरचीचा दर देखील वाढला असून, त्याची सध्या 80 किलो दराने विक्री होत आहे.

कोकणात कच्च्या फणसाची भाजी प्रत्येकाच्या आवडीची आहे. कच्च्या फणसाची सध्या मागणी वाढली असून, त्याची 40 ते 60 रूपये प्रति नग अशी विक्री होत आहे.

काही प्रमुख भाज्यांचे दर

कांदा - वीस रूपये किलो, बटाटा - तीस रूपये किलो, वांगी - चाळीस रूपये किलो, टोमॅटो - चाळीस रूपये किलो, भेंडी - साठ रूपये किलो, कोबी / फ्लॉवर - वीस ते पंचवीस रूपये प्रति नग, कोथिंबीर - पंधरा रूपये जुडी, मेथी आणि शेपू - दहा रूपये जुडी, कच्चा फणस - पन्नास ते ऐंशी रूपये नग अशी विक्री होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT