Goa Petrol-Diesel Price 13th Sept 2023 | Fuel Rates Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे; जाणून घ्या आजचे ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Petrol Diesel Price: देशभरात आज म्हणजेच बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणतेही मोठे बदल दिसून आले नाहीत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत आज 0.04 टक्क्यांनी वाढली असून ती प्रति बॅरल 92.10 डॉलरवर आहे. देशात इंधनाच्या दरात आज किरकोळ बदल झाला आहे. पण, गोव्यात इंधनाच्या किमती जैसे थे आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

VIDEO: "रस्ता नाही, तर मतदान नाही"! गोव्यातील 'या' गावच्या ग्रामस्थांचा इशारा; निवडणुकांवर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्धार

Goa Crime: म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश! 1 कोटी 27 लाखांची फसवणूक उघड; दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT