Auditions In Goa Dainik Gomantak
गोवा

Auditions In Goa: गोवेकर! सिनेमात काम करायचंय? पणजीत देता येईल मोफत ऑडिशन

गोवेकर कलाकारांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आयएनएन भारत मुंबई या प्रॉडक्शन्स हाऊस तर्फे हौशी गोवेकर कलाकारांना गोव्यात निर्माण होणाऱ्या हिंदी चित्रपटात संधी आणि मार्गदर्शनासाठी दिनांक 14-15 जानेवारीला पणजीत मोफत ऑडिशन्स आणि मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे, असे लेखक दिग्दर्शक निर्माता करण समर्थ यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

पणजी कंपाल येथील इश्ना गार्डन रेस्टॉरंट मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी सुसंवाद साधण्यासाठी जेष्ठ फ्रेंच अभिनेत्री मारियन बोरगो आणि सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक प्रिन्स जेकब ही उपस्थित होते.

फ्रेंच अभिनेत्री मारियन बोरगो हिने, "आज करण समर्थ हौशी गोवेकर कलाकारांना चित्रपट क्षेत्रात संधी देण्यासाठी जे प्रयत्न करत आहे असेच प्रयत्न मी ही काही कलाप्रेमींसह मिळून करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिक हौशी कलाकारांना निवडून त्यांना अभिनय अथवा अभिप्रेत तंत्रज्ञान शिकवून त्यांना आपल्या चित्रपट निर्मिती मधून संधी देण्याच्या करण समर्थ घ्या प्रयत्नांमध्ये मी देखील सहभागी आहे." अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.

सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक प्रिन्स जेकब म्हणाले, "गोंयकार कलाकारांच्या प्रतिमेवर विश्वास आहे म्हणून मी माझ्या चित्रपट निर्मिती साठी गोव्यात स्थलांतर करून कलाकारांना अभिनय आणि इतर तंत्रज्ञानात पारंगत करण्याचे काम सुरू केले आहे. आपण गोव्यातूनच मुख्य प्रवाहातील फिल्म निर्माण करून गोवेकर प्रतिभेला जगभर पोहोचवूया. गोवेकर कलाकारांना या संधीचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो."

कलाकारांना शनिवार 14 आणि रविवार 15 जानेवारीला सकाळी 10 ते सांय 06 वाजेपर्यंत इश्ना गार्डन रेस्टॉरंट महावीर बाल बगीचा कंपाल पणजी येथे मोफत ऑडिशन्स देता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

SCROLL FOR NEXT