Goa Shacks  Dainik Gomantak
गोवा

Shacks Commercial : शॅक्स व्यावसायिकांनी लवकरच गाशा गुंडाळला; पर्यटक घटले

Shacks Commercial : शॅक्स धोरणाची उशिरा अंमलबजावणी, चार्टर्ड विमाने नसल्याने अनेकांना नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Shacks Commercial :

फातोर्डा, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्सव्यावसायिकांनी पर्यटक नसल्याने कालावधी संपण्याच्या आधीच आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

शॅक्स पॉलिसी उशिरा घोषित केल्याचा व चार्टर्ड विमाने नसल्याने अनेक शॅक्समालकांना यंदाच्या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे.

याबाबत माहिती देताना शॅक्समालक मिनिनो फर्नांडिस यांनी सांगितले की, पर्यटक नसल्याने मी शॅक्स काढून टाकला आहे. माझ्‍या शॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकांची रेलचेल असायची आणि हे पर्यटक ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दाखल होत असत.

पर्यटक खात्याने उशिरा शॅक्स वितरण जाहीर केल्याने आणि गोव्यात दाखल होणारी चार्टर्ड विमाने इतर देशांत वळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. मला तर तब्‍बल १० लाख रुपयांचा फटका बसला.

उत्तर गोव्यातील कांदोळी येथील स्पोटी शॅक्सचे मालक व्‍हिक्‍टर परेरा म्हणाले, पर्यटक नसल्याने येत्या काही दिवसांत मी शॅक्स बंद करणार आहे. अनेकांनी आपले शॅक्स बंद केले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शॅक्स धोरणाची उशिरा झालेली अंमलबजावणी. याबरोबरच विमान सेवेचे वाढलेले दर.

यामुळे पर्यटक स्वस्त सेवेच्या देशांकडे वळले आहेत. गोव्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी चांगल्या दर्जाच्या पर्यटकांना बोलवायला हवे. सध्या पर्यटक नसल्याने स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून कामगारांना पगार देण्याची वेळ आली आहे.

पर्यटक खात्याने शॅक्स खाली करण्यासाठी ३१ मे हा दिवस निश्चित केला असला तरी त्यापूर्वी पर्यटक नसल्याने आम्हाला शॅक्स खाली करावे लागत आहेत. येणारे देशी पर्यटक खाण्यापिण्‍याचे सामान व दारू आपल्यासोबत घेऊन येतात. त्यामुळे आम्हाला ग्राहक मिळत नाहीत.

- सॅम, ‘सॅम पॅरेडाईज’चे मालक

देशी पर्यटक गोव्यात मौजमस्ती करण्यासाठी येतात. रात्री उशिरापर्यंत चालणारी किनारी भागातील संगीत रजनी त्यांचे खास आकर्षण असते. मात्र त्‍यावर सरकारने रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा घातल्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. विदेशी पर्यटकही कमी झाले आहेत.

- एन. मार्टिन, शॅकमालक (वार्का)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT