Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: पाणी बिल थकबाकी भरण्यासाठी OTS योजनेला अखेरची मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत भरता येईल बिल

सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांची माहिती

Akshay Nirmale

Nilesh Cabral: सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिलाची थकबाकीची रक्कम भरण्यासाठी वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) योजना सुरू केली होती. या योजनेची वाढवलेली एक महिन्याची मुदत 28 फेब्रुवारीला संपली.

दरम्यान, ओटीएस योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. तसेच अखेरच्या दिवसांत अनेकांनी या योजनेतून बिले भरल्याने सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली होती. अद्यापही अनेक थकबाकीदारांची बिले भरावयाची आहेत.

त्यामुळे आता या योजनेची मुदत आणखी वाढविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली.

निलेश काब्राल म्हणाले की, पाणी बिल थकबाकीदारांसाठीच्या वन टाईम सेटलमेंट योजनेला 16 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर या पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. याउपरही जर कुणी थकबाकी भरली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, फेब्रुवारी अखेरीस अनेकांकडून बिल भरले जात असल्याने सर्व्हरमध्ये बिघाड की इतर कारणांमुळे बिल भरण्यात अडचणी येत होत्या. लोकांच्या अडचणी वाढत असल्याने त्या सोडविण्यासाठी ‘सांबाखा’ने अधिक कर्मचारी त्यासाठी जुंपल्याची माहिती कार्यकारी अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिली होती.

जानेवारीत ही योजना सुरू झाली होती, त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत या योजनेची मुदत वाढविली होती. आणि आता 16 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT