Damaged Road in Goa Dainik Gomantak
गोवा

मोरजीत मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा; अपघातांत वाढ

मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा या मुख्य रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला असून तो अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा या मुख्य रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला असून तो अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर रस्‍त्‍यावर कोको आर्ट गॅलरीसमोर हा खड्डा मे महिन्‍यात जलवाहिनीचे काम करताना पडला आहे.

परंतु तो वेळीच बुजवला न गेल्यामुळे आता त्याचा आकार मोठा झाला असून दर दिवशी या खड्ड्यात पडून अनेक जण जखमी होतात. तसेच अनेकांची वाहने मोडकळीस आलेली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच खड्ड्यात पडून उदय नागवेकर हा युवक गंभीर जखमी झाला.

दरम्‍यान, स्थानिक युवक सोनू शेटगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, रात्रीच्या वेळी मोठा आवाज झाला की आम्हाला उठून कुणाच्या तरी मदतीला धावून जावे लागते. पंचायत आणि साबांखाचेही रस्‍त्‍याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चुकीला माफी नाही! पडताळणीनंतर दोषी आढळणारे 'क्लब' कायमचे बंद करणार; CM प्रमोद सावंतांचा इशारा

Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

Horoscope: 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार कर्जमुक्त; कोणाला मिळणार कुबेराचा खजिना आणि कोणाच्या खिशाला लागणार कात्री?

Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकरला धु धु धुतलं! मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा घेतला समाचार; सर्फराज-यशस्वीची धमाकेदार फलंदाजी VIDEO

SCROLL FOR NEXT