Laptop stolen at Madgaon from car parked Dainik Gomantak
गोवा

मडगाव येथे पार्क केलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीला

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Goa Police) भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा नोंदवला

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव सारख्या गजबजलेल्या शहरात भरदिवसा मध्यभागी उभ्या असलेल्या कारमधून अज्ञात व्यक्तीने दोन लॅपटॉप आणि एक मेडिकल कॅमेरा चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. (Laptop stolen at Madgaon from car parked)

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीहर गांधी, मूळ पुणे, महाराष्ट्र यांनी फिर्याद दिली की, मडगाव (Margao) येथे एका हेल्मेट दुकानासमोरून सायंकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांचे दोन लॅपटॉप (Laptop) आणि एक मेडिकल कॅमेरा चोरून नेले. कार लॉक करायची राहिल्याने या कारच दार चोरट्याला सहजरित्या उघडता आले.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Goa Police) भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा नोंदवला आणि सांगितले की चोरीच्या वस्तूंचा अंदाज अद्याप कळू शकलेला नाही. याप्रकरणी पीएसआय अल्विटो रॉड्रिग्स तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

SCROLL FOR NEXT