paper
paper Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील भाषा आणि शिक्षण संकल्पना आणि गैरसमज

दैनिक गोमन्तक डिजिटल

( सुशीला सावंत मेंडीस )

शिक्षणाच्या अध्यापनशास्त्राप्रमाणे मुलाला जे काही शिकवले जाते ते सहजतेने समजण्यासाठी मातृभाषेची नेहमीच आवश्यकता असते. आपले प्राथमिक शिक्षण कोकणी किंवा मराठीतून घेतलेली एक ज्येष्ठ पिढी गोव्यात आहे.

मला आठवते की, माझ्या दोन्ही मुलींनी देवनागरी लिपीत इंग्रजी टेलिफोन मेसेंजर वापरून संदेश लिहिले आहेत. त्यांनी त्यांच्या नवीन आत्मसात केलेल्या श्रुतलेखन कौशल्याचा वापर त्या भाषेसाठी केला जी भाषा ते प्राथमिक शाळेत शिकले नव्हते.

पोर्तुगीज ही वसाहतवादी राज्यकर्त्यांची मातृभाषा, पोर्तुगीज या भाषेच्या तुलनेत कोकणी भाषेला ‘नोकरांची भाषा’ म्हणून ओळखले जाई. माझी मुले कोकणीतून पदवीधर झाली. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खरोखरच महत्त्वाचे आहे का, हा वादाचा विषय असू शकतो, परंतु चार शतकांहून अधिक काळ गोव्यात जबरदस्तीने परदेशी भाषाच नव्हे तर परदेशी संस्कृतीही शिकविली जात होती.

काउंट ऑफ अल्व्होरचे व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को ताव्होरा यांनी १६८४साली कुप्रसिद्ध ‘अल्वारा’ संमत करून शासकीय कामांसाठी कोकणी वापरण्यास मनाई केली. पोर्तुगीज शिकण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता.

१७४५साली ‘पोर्तुगीज भाषेचे ज्ञान’ ही विवाहाची पूर्वअट बनवण्याची सूचना याजकांना देण्यात आली. काही मराठी शाळांना परवानगी असली तरी शाळांमधील शिक्षणाचे माध्यम पोर्तुगीज भाषेत बदलण्यात आले. स्थानिक भाषांचा बळी देऊन पोर्तुगीज भाषा लादण्याचा हा प्रकार, पोर्तुगिजांना प्रशासकीय व्यवस्था पाहण्यासाठी स्थानिक कर्मचारी निर्माण करणे हा होता.

सुरुवातीच्या शतकांमध्ये पोर्तुगिजांनी सुरू केलेले शिक्षण मर्यादित होते

ख्रिश्‍चन पांथिक शिक्षण, सेमिनरी आणि कॉन्व्हेंट्सच्या स्वरूपात हे शिक्षण दिले जात होते. १७७३मध्येच सरकारने विविध भागात सार्वजनिक व्याकरण शाळा स्थापन केल्या.

१८१७मध्ये ‘एस्कोला मॅथेमेटिका ई मिलितार’ची स्थापना, त्यानंतर ‘एस्कोला मेडिको सर्जिका द नोव्हा गोवा’ किंवा १८४४मध्ये मेडिकल स्कूल आणि हायस्कूल किंवा ‘लिसेव्ह नॅशनल द नोव्हा गोवा’ यांनी गोव्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले.

‘एस्कोला नॉर्मल’देखील होती जिने तरुण महिलांना शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यामुळे पोर्तुगिजांनी गोव्यातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिले, भले त्यांचा हेतू वेगळा होता.

त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच चर्चच्या पदानुक्रमातील पदांमध्ये रस असल्यामुळे अठराव्या शतकात कोइंब्रा येथे मोठ्या संख्येने गोमंतकीयांनी उच्च शिक्षण घेतले. याचा परिणाम म्हणजे समान पात्रता असल्यामुळे युरोपियन आणि गोमंतकीयांमध्ये उघड भेदभाव करणे सुरू झाले,

गोव्यात ख्रिस्तीकरण करताना पोर्तुगिजांनी सैन्य, नौदल आणि नागरी सेवा इत्यादींमध्ये नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. ख्रिश्‍चन झाल्यानंतर त्यांची भरती करण्यात आली, पण पात्रता असूनही त्यांना खालच्या पदांवरच ठेवण्यात आले. उच्च पदे गोऱ्यांनी आपल्या हातातच ठेवली. ख्रिश्‍चन होऊनही पदरी निराशेशिवाय काहीच पडले नाही.

गोव्यातील अनेक नवख्रिश्चन कुटुंबांनी आपल्या मुलांना गोव्यात जेझुइट्स, डोमिनिकन आणि फ्रान्सिसकन्स यांसारख्या ख्रिस्तीप्रसारासाठी स्थापित केलेल्या शैक्षणिक संस्था आणि सेमिनरीमध्ये शिकण्यासाठी पाठवले. या विद्यालयांत शिक्षण घेतलेले गोमंतकीय कुठल्याच दृष्टिकोनातून गोऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नव्हते. पण, आपल्या मुलांना उच्च पद मिळेल या आशेवर असलेल्या नवख्रिश्‍चनांचा भ्रमनिरास झाला.

घडले असे की, सरकार आणि चर्चमधील उच्च स्थानांवर नियुक्त्या गुणवत्तेवर नव्हे तर गोऱ्या कातडीचे पोर्तुगीज मूळ ख्रिश्‍चन असण्यावर अवलंबून होत्या. ख्रिश्‍चन झाले म्हणून गोमंतकीयांना कधीही पोर्तुगीज ख्रिश्‍चनांप्रमाणे दर्जा आणि वागणूक मिळाली नाही. पोर्तुगीज आणि गोव्यातील शिक्षित नवख्रिश्‍चनांमधील संघर्ष त्यामुळेच दीर्घकाळ सुरू राहिला.

१९१०पर्यंत गोव्यात शिक्षण मर्यादित होते; सरकारी संस्थांमध्ये हिंदूंना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. मिनेझिस ब्रागांझा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, पोर्तुगीजकालीन गोव्यात१८६९-७०मध्ये ११२ प्राथमिक शाळा होत्या, त्यापैकी फक्त १६ नवीन काबिजादीत होत्या. त्यांपैकी अनेक मिशनरि, सरकारी आणि खाजगी मालकीच्या शाळा होत्या.

पाश्‍चात्त्य शिक्षणाने रुसो, मॉंटेस्क्यु आणि व्होल्टेअर यांसारख्या फ्रेंच तत्त्ववेत्त्यांची ओळख करून दिली आणि गोव्यातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या कल्पना दिल्या. अलेक्झांड्रे हर्कुलॅनो, कॅमिलो कॅस्टेलो ब्रँको, ऑलिव्हेरा मार्टिन्स, रामाल्हो ऑर्टिगाओ आणि ऍक्विलिनो रिबेरो यांसारख्या पाश्‍चात्त्य विचारवंतांचे वाचन आणि प्रभावामुळे गोमंतकीय उदारमतवादी विचारसरणीचा झाला.

कोम्युनिदादने पात्र विद्यार्थ्यांना पोर्तुगालमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यामुळे कोइंब्रामध्ये अनेक तरुण मुलांना औषध, वैद्यकीय आणि कायदाविषयक उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली. गोव्यातील काणकोणसारख्या काही भागांत क्षत्रिय जात, मडगावमध्ये कॅथलिक ब्राह्मण असल्यामुळे परदेशात शिकण्यासाठी तरुण विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेवर आधारित नव्हती!

१९२०च्या सुरुवातीस पोर्तुगालमधील काही गोमंतकीयांनी ‘सांत्रो इंडियानो’ची स्थापना केली. या संस्थेच्या सदस्यांमध्ये प्रमुख होते अदेओदातो बार्रेटो आणि जॉर्ज आताइद. या तरुण मुलांनी प्रश्न उपस्थित केले. बार्रेटोने पोर्तुगीज भाषेत हिंदू सभ्यतेवर एक पुस्तक लिहिले आणि आपल्या सर्व मुलांची नावे कालिदास आणि शकुंतला अशी भारतीय ठेवली. गोव्यातील विद्यार्थी पोर्तुगालचा इतिहास आणि भूगोल शिकले.

‘शाकुंतल’ वाचण्यापूर्वी त्यांनी ‘फ्री लुईस डी सूझा’ वाचले. गोव्याचे तरुण विद्यार्थी ओस लुसियादासमधील डझनभर ओळी पाठ करण्यास सक्षम होते, परंतु रामायण किंवा महाभारतातील एकही श्लोक नाही.

परकीय संस्कृती त्यांच्यावर लादली जात असल्याविरुद्ध सुशिक्षित गोमंतकीयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्यासाठी भारतीय संस्कृती परकीय बनली होती आणि त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये अतिशय पद्धतशीरपणे त्यांच्यावर परदेशी संस्कृती लादली गेली आहे, हे त्यांच्या लक्षात आले.

त्याच काळात गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात किंवा स्वायत्ततेच्या सांस्कृतिक आधाराचा नायक म्हणून वामन रघुनाथ शणै वर्दे वालावलीकर (शणै गोंयबाब, १८७७-१९४६) सक्रिय झाले. त्यांना कोकणी भाषेचा जाज्वल्य अभिमान होता.

गोवामुक्ती आणि कोकणी भाषेला पूर्वीचा दर्जा मिळावा, या बाबींवर त्यांच्या साहित्यिक रचनांमधून त्यांनी भर दिला. तेव्हापासून, विशेषत: गोवा मुक्तीनंतर, आमच्या छोट्या राज्यावर राजकीय पक्षांच्या माध्यमातून राज्य करणाऱ्या प्रत्येक सरकारने शिक्षणाच्या वाढीसाठी तसेच कोकणी आणि मराठीच्या विकासासाठी मदत केली आहे.

आज आमचे स्वतःचे विद्यापीठ आहे, अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, बहुतांश तालुक्यांमध्ये पदवी महाविद्यालये आहेत, ज्यामुळे शिक्षण गोव्याच्या आवाक्यात आले आहे. आमच्याकडे आर्किटेक्चर, ललित कला, नर्सिंग आणि शिक्षण आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारी व्यावसायिक महाविद्यालये आहेत.

गोवामुक्तीमुळे पोर्तुगीज काळातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वाढ आणि स्थानिक भाषांच्या विकासात अडथळा आणणारे घटकही वाढले आहेत.

आज गोवा हे शिक्षणाचे केंद्र आहे, जिथे भाषेच्या माध्यमापेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व दिले जाते. शिक्षण महत्त्वाचे आहे; माध्यम नाही, हा गोमंतकीय शिक्षणाचा महत्त्वाचा पैलू जगासमोर येणे महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Goa Today's Live News: खलप म्हणतात, पर्रीकरांमुळे म्हापसा अर्बनची अशी स्थिती

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

SCROLL FOR NEXT