Landslide in Anmod Ghat  Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसामुळे अनमोड घाटात दरड कोसळली

दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु; वाहतूक खोळंबली

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात पावसाने हाहाकार माजवला असून सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून अनमोड घाटात दरड कोसळली. सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून. वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अनमोड घाटात दुधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत दरड कोसळल्याची माहिती आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गोवा-कर्नाटक मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दरड कोसळल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान गोव्यात पावसाने सकाळपासूनच दमदार बॅटिंग केली आहे. राजधानी पणजीत पाणी साचल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. तर मेरशी जंक्शनपासून पणजीत येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिरामार सर्कल, बांबोळी परिसरातही पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT