IIT Goa Campus Dainik Gomantak
गोवा

IIT Goa: गोव्यात IIT च्या इमारतीला मिळेना जागा; भूसंपादनात अडथळे, सरकारची 'परीक्षा'

IIT Goa Campus: जमिनीच्या मालकी हक्काच्या समस्येमुळे सांगे तालुक्यातील रिवण या गावात सुरु होणार IIT प्रकल्प पुन्हा स्थगित झालाय

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa Campus

गोव्यात IIT कॅम्पस सुरु करण्याचे सरकारचे स्वप्न पुन्हा एकदा रखडले आहे. जमिनीच्या मालकी हक्काच्या समस्येमुळे सांगे तालुक्यातील रिवण या गावात सुरु होणार IIT प्रकल्प पुन्हा स्थगित झालाय.

गोवा राज्य सरकार IIT कॅम्पसच्या बांधणीसाठी योग्या जागेच्या शोधात आहे. वर्ष 2021 मध्ये सत्तरी तालुक्यातील माळोली या गावात हा प्रकल्प उभा राहणार होता. मात्र स्थानिकांच्या आंदोलनामुळे राज्यसरकारने जनतेच्या हितासाठी हा निर्णय मागे घेतला. रिवण या गावात झालेल्या जमिनीच्या समस्येमुळे आता सरकारला पुन्हा एकदा जागा शोधण्याची मोहीम सुरु करावी लागणार आहे.

साधारण एक वर्षापूर्वी दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी IIT गोवा कॅम्पससाठी रिवण या गावात सुमारे 10.5 लाख चौरस मीटर भूसंपादनासाठी एक सूचना जारी केली होती, आणि यावर्षीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून या जमिनीला अधिकृत मान्यता मिळाली होती. गोव्यात वर्ष 2016 पासून IIT सुरु झाले आहे, मात्र जागा उपलब्ध नसल्याने फर्मागुडी फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तात्पुरते हे काम चालते.

गोव्यात IIT कॅम्पससाठी जागा शोधणं हीच सरकारसाठी परीक्षा ठरत आहे. कधी या जमिनीला केंद्रातून मान्यता मिळत नाही तर अनेकवेळा स्थानिकांच्या नाराजीमुळे हा प्रकल्प मागे घ्यावा लागतो. यापूर्वी काणकोण आणि सत्तरीमधून देखील स्थानिकांची सहमती नसल्याने हा प्रकल्प हलवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT