Car Accident in Gulelim Sattari Goa Dainik Gomantak
गोवा

भरधाव कारची वीजेच्या खांबाला धडक

गुळेलीतील अपघातात कारमधील युवती जखमी, वीजेच्या तारा रस्त्यावर

दैनिक गोमन्तक

सत्तरी : गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. सत्तरीमधील गुळेली भागात मंगळवारी सकाळी पुन्हा एक अपघात पाहायला मिळाला. या अपघातात भरधाव कारची वीजेच्या खांबाला जोरदार धडक बसली. यात कारमधील तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. (Car Accident in Gulelim News Updates)

सत्तरी परिसरातील गुळेली भागात मंगळवारी सकाळी कारचा (Car) अपघात झाला. कारने रस्त्याशेजारील वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. यात वीजेचा खांब वाकून विद्युतभारित तारा रस्त्यावर आल्या. अपघातात कारमधील तरुणीला इजा झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान वीजेच्या तारा रस्त्यावर आल्यामुळे काहीकाळ वाहतुकीचाही (Traffic) खोळंबा झाला होता. अपघाताचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान गोव्यात गेल्या आठवडाभरात अपघातांचं (Accident) सत्र वाढलं आहे. ओल्ड गोवा परिसरात माड कोसळून एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमावावा लागला होता. तर बांबोळी परिसरात भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने 20 प्रवासी जखमी झाले होते. या अपघातात चालकही गंभीर जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT