Hearse Van  Dainik Gomantak
गोवा

एका बाजूने मनस्ताप तर दुसऱ्या बाजूने खिशाला चाट! दु:खद प्रसंगीही होतेय शववाहिकेमुळे कुचंबणा

Hearse Van: शववाहिकेअभावी वाळपई आणि पर्ये परिसरातील शोकाकुल कुटुंबीयांना मृतदेह वाहून नेण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावी लागत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात शववाहिकेअभावी वाळपई आणि पर्ये परिसरातील शोकाकुल कुटुंबीयांना मृतदेह वाहून नेण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावी लागत आहेत. अनेकदा शववाहिका पणजी आदी ठिकाणांहून वाळपई भागात आणावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांना एका बाजूने मनस्ताप, तर दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागत आहेत.

वाळपई भागात एकच शववाहिका कार्यान्वित होती आणि तीसुध्दा बंद अवस्थेत असल्याने पालिकेने तातडीने दुसऱ्या वाहनाची सोय करणे अपेक्षित आहे. सत्तरी तालुका मोठा असून वाळपई, पर्ये या मतदारसंघांत शववाहिका नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा पोलिसांनाही अपघातात मरण पावलेल्यांना गोमेकॉत शवचिकित्सेसाठी नेताना तासन तास वाट पाहावी लागते.

दोन दिवसांपूर्वी नगरगाव येथील होमगार्डने वेळूस पुलावरून नदी उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह रविवारी संध्याकाळी दाबोस येथे पाण्यात तरंगताना आढळला.

तो मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी नेण्यास शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना चार तास वाट पाहावी लागली. कुठे शववाहिका उपलब्ध आहे का, याची चौकशी केल्यानंतर पणजीतून शववाहिका आली. रात्री उशिरा हा मृतदेह गोमेकॉत नेला.

सोमवारी होंडा येथे एका १९ वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती. यावेळीही तोच प्रकार घडला. कित्येक तास मृतदेह शववाहिकेअभावी ठेवावा लागला. अनेकदा खासगी वाहनचालक दुप्पट पैशांची मागणी करतात. त्यामुळे वाहनाअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पाठपुरावा करूनही सहकार्य नाही

वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून वाळपई पालिकेची शववाहिका बंद आहे. या शववाहिकेला १५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ती बंद ठेवली आहे. हे वाहन बंद होण्यापूर्वीच आम्ही नवीन वाहनासाठी मागणीचा प्रस्ताव खात्याला पाठविला होता.

वाळपई भागात शववाहिका नसल्यामुळे मोठी अडचणी निर्माण झाली आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांतून लवकरच वाळपई पालिकेला शववाहिका उपलब्ध केली जाणार आहे.
प्रसन्ना गावस, नगराध्यक्ष, वाळपई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT