Goa Panchayat Polling Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Polling: अंध, दृष्टिहिन लोकांसाठी मतदान केंद्रावर सुविधांची वाणवा

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज 186 पंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे तेथील मतदान उद्यावर ढकलण्यात आले आहे. सायकांळी चार वाजेपर्यंत राज्यात 77 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, काही मतदान केंद्रावर अंध, दृष्टिहिन लोकांसाठी सुविधांची वाणवा पहायला मिळाली.

अंध, दृष्टिहिन लोकांसाठी मतदान केंद्रावर ब्रेल लिपी पुरवण्यात आली नाही. तसेच, मतदान करताना सोबत एक व्यक्ती आल्याने मतदाराची गोपनियता देखील भंग पावली. पंचायत निवडणूकीत मतदानासाठी ब्रेल लिपीची तरतुद नसल्याने वैयक्तित मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे वैयक्तित आणि गोपनिय पद्धतीने अंध किंवा दृष्टिहिन लोकांना मतदान करता यावे यासाठी योग्य उपाययोजना केली जावी अशी मागणी अंध व्यक्तिने केली.

दरम्यान, गोव्यात आज 186 पंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. तर, कळंगुटच्या प्रभाग 09 साठी उद्या मतदान होणार आहे.12 तारखेला मतमोजणी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT