Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मजबूत पुरावे सादर करू न शकल्याने मुलाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या बापाची निर्दोष सुटका

Goa Crime News: पती - पत्नीचा वाद सुरु असताना मुलाना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता चाकू खूपसून हत्येचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दारू प्यालेल्या अवस्थेत आपल्याच मुलाच्या पोटात चाकू खूपसून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या बाबू नाईक तलवार याच्या विरोधात अभियोग पक्ष मजबूत पुरावे सादर करू न शकल्याने त्याला दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी त्याला संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणी संशयिताची पत्नी संगीता नाईक हिने तक्रार दाखल केली होती. संशयित हा मूळ बेळगाव येथील राहणारा असून करमणे येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. ९ सप्टेंबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळी तो प्यालेल्या अवस्थेत घरी आला.

त्याने पत्नीकडे वाद सूरू केला. त्यावेळी त्याचा मुलगा पीटर याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता बाबूने त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवला होता.

या प्रकरणी संशयिताच्या वतीने ॲड. सिंथिया परब यांनी बाजू मांडताना साक्षीदारांच्या सक्षितही बरीच विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT