Goa Road Condition Dainik Gomantak
गोवा

Ponda Road: फोंड्यात खोदकाम सुरूच मात्र समन्वयाचा अभाव

Goa Road Condition: जलवाहिन्या फुटणे नित्याचेच कुर्टीत खड्ड्यात अडकला टॅंकर, वाहतूक ठप्प

दैनिक गोमन्तक

Ponda Road: फोंड्यात विविध विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सुरू असून या कामावेळी सरकारी खात्यात कोणताच समन्वय नसल्याने जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मात्र त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

कुर्टी येथील गोवा डेअरीजवळील रस्त्यावर भूमिगत वीजवाहिन्यांसाठी रस्ता खोदल्यानंतर तिथे मारलेल्या चरीमध्ये गोवा डेअरीचा दूधवाहू टँकर अडकल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. या प्रकारामुळे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.

खड्ड्यात अडकलेला टँकर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. शेवटी मशीन आणून काम केल्यानंतर टँकर खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकारामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच करावा लागला, त्यामुळे लोकांना नाहक हेलपाटे पडले.

दरम्यान, अशाप्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी वीज खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडे संबंधित खोदकाम करणाऱ्यांनी समन्वय साधण्याची आवश्‍यकता असून लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

कंत्राटदाराची मनमानी

अन्य एका घटनेत मेस्तवाडा - कुर्टी येथे वीजवाहिन्यांसाठी खोदकाम सुरू असून घरगुती गॅसवाहिनी फुटली. गॅसवाहिनीला गळती लागल्याने काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली, पण त्यानंतर स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीची पाहणी केली. मुख्य म्हणजे कंत्राटदार आपल्या मजुरांकरवी आपल्याला हवे तेथे खणतो, पण जमिनीखाली काय आहे, ते पाहण्याची तसदी घेत नाही, त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT