Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: ...तर एक लाखापर्यंत दंड आणि कैदेचीही शिक्षा; मोन्सेरात यांची माहिती

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: नोकर भरतीच्या जाहिराती गोव्याबाहेर देऊन कर्मचारी भरती केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजूर कायद्यात दुरुस्ती करण्यात येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील कंपन्यांनी नोकर भरतीच्या जाहिराती गोव्याबाहेर देऊन कर्मचारी भरती केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजूर कायद्यात दुरुस्ती करण्यात येत आहे. कारवाईची दंडात्मक रक्कम पाचशेवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. ती १ लाखापर्यंत असेल. याव्यतिरिक्त कैदेच्या शिक्षेचीही त्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती मजूर व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

मोन्सेरात म्हणाले की, राज्यात आर्थिक वाढ तसेच विकास होत असला तरी बेरोजगारीची समऱ्या दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालली आहे. खासगी कंपन्या तसेच सरकारी खात्यातील रिक्त जागांवर रोजगार मिळेल, अशा प्रतीक्षेत अनेकजण आहेत. सरकारने राज्यात रोजगार मेळावे आयोजित केले. मात्र, त्यातून बेरोजगारीचा प्रयत्न सुटलेला नाही.

रोजगार नसल्याने स्थानिक परदेशात व क्रुझ बोटीवर कामासाठी जात आहेत. सरकार त्यांना रोजगार उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे परदेशात नोकऱ्या मिळविण्यासाठी त्यांना आर्थिक साहाय्य करावे. गोव्यातील काही शिपिंग कंपन्या आणण्यास माझी तयारी आहे व काहींच्या संपर्कात आहे. मात्र, त्यासाठी सरकारने या कंपन्यांसाठी कार्यालय स्थापन करण्यासाठी जागा देण्याची गरज आहे.

आयपीबीमधून २३ हजार नोकऱ्या उपलब्ध करण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र, फक्त २५०५ नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकारकडून कोणती ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली.

या सूचनेवरील चर्चेवेळी मायकल लोबो, वीरेश बोरकर, नीलेश काब्राल, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, रुडॉल्फ फर्नांडिस, युरी आलेमाव यांनी भाग घेऊन राज्यातील बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित करीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT