Ravi Naik Gomatak Digital Team
गोवा

Ponda News : कुर्टी-खांडेपार सरपंचपदी संजना नाईक

पंचायतीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुर्टी-खांडेपार सरपंचपदी संजना सुदेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवारी सरपंच निवडीसाठी खास बैठक बोलावण्यात आली होती. त्यात संजना नाईक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्‍यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या पंचायतीवरही आता भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

सरपंचपदासाठी बोलावलेल्या बैठकीला उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य संजना नाईक, साजिदा सय्यद, हरेष नाईक, मनीष नाईक व अभिजीत गावडे यांच्‍यासह भिका केरकरही उपस्थित होते. अकरा पंचायत सदस्‍य मंडळातील इतर चारजण अनुपस्थित राहिले.

निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा गटविकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी सोमनाथ तारी उपस्थित होते. पंचायत सचिव सचिन नाईक यांनी त्यांना सहकार्य केले.दरम्यान, सरपंच निवडीनंतर सर्व सहाही पंचांनी कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले व कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या विकासकामांना सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक आमचे नेते असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंचायत क्षेत्राचा विकास केला जाईल. सर्व प्रभागांत विकासकामे करताना कोणताही भेदभाव ठेवला जाणार नाही. त्यात कचरा नियोजन, स्मशानभूमी बांधकाम, नवीन पंचायतघर व इतर कामांचा समावेश आहे.

संजना नाईक, सरपंच, कुर्टी-खांडेपार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT