Someshwar Temple Festival Dainik Gomantak
गोवा

Someshwar Temple Festival: सोमेश्वर देवस्थान उत्सवाची तयारी जोरात, मंत्री सुभाष फळदेसाईंनी केली पाहणी; भाविक मोठ्या संख्येने येणार

Shri Someshwar Temple Festival Kurdi: कुर्डी-सांगे येथील श्री सोमेश्वर देवस्थानाचा उत्सव रविवारी (ता. २४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: कुर्डी-सांगे येथील श्री सोमेश्वर देवस्थानाचा उत्सव रविवारी (ता. २४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुर्डी येथे जाऊन पूर्वतयारीची पाहणी केली.

यावेळी फळदेसाई यांनी साळवली धरण बांधण्यासाठी कुर्डी गावातील लोकांनी आपले गाव तसेच देवस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतर केल्याचे सांगितले. कुर्डी गावातील लोकांनी आपल्या जमिनी दिल्यामुळेच दक्षिण गोव्यातील जनतेला पिण्याचे पाणी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुर्डी येथील श्री सोमेश्वर देवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.

धरणातील पाणी उतरल्यावर मंदिराकडे जाणारा रस्ता मोकळा होतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक तेथे भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून श्री सोमेश्वर देवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.

त्यानिमित्त सकाळी १० वाजता अभिषेक, पूजा-आरती, भजन व तीर्थप्रसाद, तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT