Goa News| Kuravpur Vari Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुगाळी देवस्थानच्या कुरवपूर वारीला 28 जानेवारीपासून प्रारंभ

मुगाळी कुडतरी येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानच्या वतीने यंदाची कुरवपूर वारी 28 जानेवारी रोजी निघणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मुगाळी कुडतरी येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानच्या वतीने यंदाची कुरवपूर वारी 28 जानेवारी रोजी निघणार असून ही या देवस्थानातर्फे काढण्यात येणारी वी वारी असेल. प.पू. पांडूबाबा यांनी काही वर्षे कुरवपूर येथे श्रीदत्त स्थळी मानव कल्याणासाठी तपसाधना केली.

आणि त्याचेच फळ म्हणून आज मुगाळी येथे भव्य असे मंदिर उभे करून हजारो भक्तगणांचे श्रद्धा स्थान बनविले. या मंदिरा तर्फे वार्षिक वारी कुरवपूरला निघते. यंदाची ही 49वी वारी असून 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्याचे मंदिराने ठरविलेले आहे.

तरी सर्व भक्त मंडळींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. वारीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाकडून तीन हजार रूपये शुल्क आकारण्यात येईल, यात जेवणाची सोय होईल.

मंगळवार दि.31 जानेवारी रोजी अतिरिक्त बस कुरवपूर साठी निघेल आणि 3 फेब्रुवारी रोजी कुरवपूरहून मडगावी परत निघेल. अधिक माहिती साठी तुकाराम नाटेकर किंवा दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT