Market  Dainik Gomantak
गोवा

Kulem: कुळेत दुकानमालकांनी फुटपाथ अडवल्याने पर्यटक रस्त्यावर; वाहतुकीची कोंडी

दूधसागर टॅक्सी स्टॅण्डसुद्धा याच इमारतीत येत असल्याने पर्यटक नावनोंदणी करण्यासाठी येथे उभे राहातात.

दैनिक गोमन्तक

Kulem: कुळे बाजारात पंचायत इमारतीमध्ये असलेल्या दुकानमालकांनी पदपथ अडवल्याने दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

सरपंच गोविंद शिगावकर यांनी याची दखल घेऊन पदपथ अडवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुळेवासीयांनी केली आहे.

कुळे-शिगाव पंचायतीची मोठी इमारत आहे. तेथे अनेक दुकाने आहेत. दूधसागर टॅक्सी स्टॅण्डसुद्धा याच इमारतीत येत असल्याने पर्यटक नावनोंदणी करण्यासाठी येथे उभे राहातात. ती लांबलचक रांग रस्त्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे वाहनांना त्याचा अडथळा होतो.

दुकानमालकाकडून पर्यटकांना अरेरावी

पर्यटक जेव्हा दुकानासमोर उभे राहतात, तेव्हा दुकानमालकांकडून त्यांना अरेरावी करतात. हा प्रकार असाच सुरू राहिला तर पर्यटन व्यवसायावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कुळे दूधसागर असोसिएशनने पर्यटकांसाठी शेड उभारावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

SCROLL FOR NEXT