Kulem Liqueur Seized Dainik Gomantak
गोवा

Kulem Liqueur Seized : कुळे पोलिसांकडून मोले येथे दारू जप्त

Kulem Liqueur Seized : कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुमन गावकर यांनी ही कारवाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kulem Liqueur Seized :

कुळे, मोले येथून कर्नाटक राज्यात दारू घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई करत कुळे पोलिसांनी १ लाख २८ हजारांची दारू जप्त केली. तसेच तिनईघाट येथील चौघा संशयितांसह दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून दारू घेऊन आडमार्गे जंगलातून तिनईघाट-कर्नाटक येथे जात असता गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संशयितांच्या बॅगांची तापासणी केली तेव्हा त्यांच्याजवळ ३३ लिटर दारू सापडली.

दारू वाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असलेली कोणतीही कागदपत्रे दाखविली नसल्याने कुळे पोलिसांनी प्रकाश देवप्पा हनबार (१९), नागेश वडार (१९), अशोक देवप्पा हनबार (१९) व बोंडाप्पा नारायण हनबार (२७) सर्वजण तिनईघाट-कर्नाटक येथील असून त्यांच्याजवळील दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुमन गावकर यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT