waste project in goa Dainik Gomantak
गोवा

कुडचडे कचरा प्रकल्प कुणाच्या माथी मारण्यासाठी ?

नगरसेवक बाळकृष्ण होडारकर: चित्र रंगवले होते, तसा प्रकल्पच नाही !

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडे काकोडा नगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणा बसवून चालू केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाबद्दल नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकल्पाविषयी जसे पूर्वी चित्र रंगवले होते, तसा हा प्रकल्प नसून तो कुणाच्या माथी मारण्यासाठी आणला आहे, तेच समजत नसल्याचे होडारकर म्हणाले.

(Kudchade waste project In Goa)

गेल्या महिन्यात हा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात सुक्या व ओल्या कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया होणार असल्याने लोकांनी सुका व ओला कचरा वेगळा करून द्यावा, अन्यथा कारवाई करू,असे पालिकेने सांगितल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर प्रकल्प बसवण्यापूर्वी वर्गीकरण न करता एकाच ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले होते. पण आता प्रत्यक्षात तसे होणार नसल्याचे सांगितल्याने लोकांवर कचऱ्याचे दुहेरी ओझे पडणार आहे. पालिकेची कचरा टाकण्याची जागा विज्ञान व तंत्रज्ञान खात्याला देऊन मोठी चूक केल्याचे आता कळून येते, असेही त्यांनी सांगितले.

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे, तिथे मोठ्या प्रमाणात कचरा होता. पण तो अचानक गायब कसा झाला, त्याचे पैसे कुठे गेले हा मोठा प्रश्न आहे, असे होडारकर म्हणाले. सदर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी चार तालुक्यांतून कचऱ्याची उचल करण्याचे ठरले पण हा कचरा पुरणार नसल्याने आणखी तालुक्यातूनही कचरा काकोडा येथे येऊ शकतो. हा प्रकल्प कुणाच्या फायद्यासाठी उभारण्यात आला, ते समजत नसून बाहेरची घाण मात्र या प्रकल्पात येणार हे निश्चित झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कुडचडे काकोडा पालिकेसाठी भली मोठी वास्तू उभारली आहे. या इमारतीत काही दुकाने अन् दोन सिनेमागृहेही असून ती अद्याप सुरू न झाल्याने त्यांच्यावर खर्च झालेला पैसा पाण्यात जाण्याची भीती आहे. शिवाय दुकाने बरीच मोठी असल्याने ती भाडेपट्टीवर कुणीही घेण्यास पुढे येतील असे दिसत नसून तीही तशीच पडून राहतील,असे वाटते. सध्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात काम करण्याची मुभा नसून या पालिकेत भलतेच राजकारण सुरू असून ते लोकांसाठी मारक ठरत आहे, असे होडारकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT