Curchorem Drug Capital Goa Dainik Gomantak
गोवा

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: भाजप सरकारच्या अपयशामुळे कुडचडे शहर गोव्याची 'ड्रग कॅपिटल' बनत असल्याचा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: भाजप सरकारच्या अपयशामुळे कुडचडे शहर गोव्याची ‘ड्रग कॅपिटल’ बनत असल्याचा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. शैक्षणिक संस्थांमधील व्यवस्थापन, प्राचार्य व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी ही चिंता व्यक्त केली.

तरुणांमध्ये अमली पदार्थांचा वाढता धोका रोखण्यासाठी प्रतिबंध, जनजागृती, सतर्कता आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे पाटकर यांनी सांगितले. काही विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेले असल्याने त्यांचे पालक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांविरोधात कडक मोहीम राबविण्याची वेळ आली असून, केवळ अधूनमधून छापे टाकून किंवा प्रसिद्धी मोहिमा राबवून हा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून अमली पदार्थांचा व्यवसाय फोफावला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रस्ते आणि इमारती म्हणजेच विकास नव्हे. मुलांच्या भवितव्यावर अमली पदार्थांचे सावट असेल, तर विकासाचा अर्थ काय?’ असा सवाल करत सरकारने अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली.

ऑक्टोबरपासून जनजागृती मोहीम

येत्या ऑक्टोबरपासून कुडचडे परिसरात शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून सातत्यपूर्ण अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा पाटकर यांनी केली. त्यानंतर ही मोहीम संपूर्ण गोव्यात राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT