Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: कोकणी ‘रामायण’ तरुणांसाठी मार्गदर्शक ठरो- ॲड. उदय भेंब्रे

गावणेकरांच्या ‘वाल्मिकी रामायण’चे कुंडईत प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

माणिकराव राम नायक गावणेकर यांनी कोकणीतून लिहिलेले ‘वाल्मिकी रामायण’ तरुण पिढीला मार्गदर्शक आणि योग्य दिशा देणारे ठरो, असे प्रतिपादन कवी आणि साहित्यिक अॅड. उदय भेंब्रे यांनी केले.

प्रसिद्ध अनुवादक आणि साहित्य अकादेमीचे विजेते माणिकराव राम नायक गावणेकर यांनी लिहिलेल्या संपूर्ण वाल्मिकी रामायणाच्या सात खंडांचे प्रकाशन केल्यानंतर अॅड. उदय भेंब्रे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

व्यासपीठावर उदय भेंब्रे यांच्या सोबत अतिथी म्हणून अरविंद भाटीकर, अध्यक्ष म्हणून दुर्गाकुमार नावती, लेखक माणिकराव गावणेकर, प्रकाशक दिनेश मणेरकर आणि अमोघ बुडकुले यांची उपस्थिती होती.

श्री नवदुर्गा देवस्थान, कुंडई येथे झालेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी मोट्या संख्येने उपस्थित होते. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे अलंकार. रामायण महाकाव्याचा अनुवाद माणिकराव गावणेकर यांनी कोकणीत केलाय.

सोप्या, सुटसुटीत भाषेत हा अनुवाद केल्याने सामान्य वाचकालाही हा भावेल, असा विश्वास उदय भेंब्रे यांनी व्यक्त केला. यावेळी अन्‍य मान्‍यवरांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. दिनेश मणेरकर यांनी स्वागत केले. अमोघ बुडकुले यांनी सूत्रसंचालन केले.

मुखपृष्ठकाराचा सन्मान

माणिकराव गावणेकर यांनी कोकणीत अनुवाद केलेल्या बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किंश्किंद कांड, सुंदर कांड, युद्ध कांड आणि उत्तर कांड अशा सात खंडाच्या ह्या महाकाव्याच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठे काढणाऱ्या सिया पंडित यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT