Konkani Literature Dainik Gomantak
गोवा

Konkani Literature : कोकणी साहित्य शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध होणे आवश्‍यक : डॉ. किरण बुडकुले

Konkani Literature : नीला तेलंग, किरण म्हांब्रे यांचा पुस्तकांचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Konkani Literature :

सासष्टी, कोकणी साहित्यात भर पडत आहे, ही चांगली गोष्ट आहे. नव नवीन साहित्यिक कोकणीकडे वळत आहेत, पण काही नवीन लेखक आपले साहित्य आपल्या पेक्षा जास्त अनुभवी लेखकांकडून तपासत नाहीत. त्याचे शुद्धीकरण करीत नाहीत.

अशा वेळी आपले साहित्य प्रसिद्ध करण्यास घाई गडबड करू नये. थोडा उशीर झाला तरी हरकत नसते पण आपले साहित्य शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध करावे व त्याला जास्त महत्त्व असल्याचे डॉ. किरण बुडकुले यांनी सांगितले.

संजना पब्लिकेशनने नीला तेलंग यांच्या "कथा गतिमंदाचे प्रगतीची"(अनुवादित कथा संग्रह), "सत्यं शिवं सुंदरम" (कविता संग्रह) व किरण म्हांब्रे यांचा "थुन्नायो" (कथा संग्रह) या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात त्या अध्यक्ष या नात्याने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. राजेंद्र हेगडे व ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र हेगडे यांनी सांगितले की, जशी जशी एक एक पिढी नाहीशी होते, त्याच्याबरोबर कोकणीतील जे मूळ शब्द आहेत ते सुद्धा लोप पावत चालले आहेत. त्यासाठी कोकणीतील जे मूळ शब्द आहेत त्यांचे संकलन होणे आवश्यक आहे.

संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, किरण म्हांब्रे यांचा बालसाहित्य रचनेत हातखंडा आहे. बालसाहित्य हा कठीण साहित्यिक प्रकार आहे व त्याच बरोबर मुलांचे भविष्य घडविण्यासाठी ते आवश्यक आहे. नीला तेलंग बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, तिच्या कवितांतून तत्वज्ञान व्यक्त होत असते. लेखिका किरण म्हांब्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

कोकणी साहित्यातील सुवर्ण युग लवकरच

डॉ. किरण बुडकुले यांनी यावेळी सांगितले की, ज्या गतीने कोकणी साहित्याची वाढ होत आहे ते पाहता कोकणी साहित्यातील सुवर्ण युग लवकरच येणार आहे. काही कोकणी लेखकांना जो सन्मान मिळायला पाहिजे होता तो मिळाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी नीला तेलंग व किरण म्हांब्रे यांच्या साहित्याबद्दल बोलताना सांगितले की दोघांच्याही साहित्यात आध्यात्मिक सूर जाणवतो पण तो अंधश्रद्धेचा मुळीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT