Amit Patkar dainik gomantak
गोवा

'कोकणी भाषा ही गोवेकरांची ओळख'

अमित पाटकर: शणै गोंयबाब सेवा केंद्रातर्फे मान्यवरांचा गौरव

दैनिक गोमन्तक

कुडचडे: राजभाषेचा प्रशासनात सर्रासपणे उपयोग व्हायला हवा. कोकणी ही गोवेकरांची निर्विवाद ओळख असल्याचे मत गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले. सावर्डे कुडचडे येथील शणै गोंयबाब सेवा केंद्र आयोजित कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कला आणि संस्कृती खात्याचे माजी संचालक एम. व्ही. नाईक होते. यावेळी कोकणीतील साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते संजीव वेरेकर, मंगळुरूच्या विमला पै फाउंडेशनचे पुरस्कार विजेते उदय म्हांबरे यांचा सत्कार करण्यात आला.

कोकणी गोवेकराचा श्वास आहे. गोव्यातील विलीनीकरण वाद, कोकणीची साहित्य अकादमी मान्यता, घटकराज्य, राजभाषेची चळवळ यांच्या अभ्यासाअंती बोलत असल्याचे पाटकर यांनी सांगितले. नाईक यांनी गोव्यातील कला आणि संस्कृतीचा आढावा घेतला. परराज्यात कोकणी हीच गोवेकराची एकमेव ओळख असल्याचे ते म्हणाले. केंद्राचे अध्यक्ष मनोहर पांगो नाईक यांनी प्रास्ताविक, विठ्ठल सावंत आवदियेकर यांनी सूत्रनिवेदन केले आणि सचिव मोहनदास सावंत देसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT