Konkan Railway
Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Special Train : कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त विशेष गाडी; पर्यटकांसाठी खास सोय

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Special Train :

मडगाव, गोव्यात पर्यटनासाठी येणऱ्यांची गर्दी पाहून उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी अशी आणखी एक विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय होणार आहे.

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गाडी क्रमांक ०१०१७/०१०१८ लोकमान्य टिळक (टी) - थिवी - लोकमान्य टिळक (टी) विशेष (त्रि-साप्ताहिक) गाडीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

गाडी क्र. ०१०१७ लोकमान्य टिळक (टी)- थिवी स्पेशल ट्राय-साप्ताहिक लोकमान्य टिळक (टी) येथून २६ एप्रिल ते ४ जून २०२४ या कालावधीपर्यंत दर शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी २२.१५ वाजता सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता थिवीला पोहोचेल.

सेवेचा लाभ घ्यावा

गाडी क्र. ०१०१८ थिवी- लोकमान्य टिळक (टी) विशेष

त्रि-साप्ताहिक थिवी येथून २७ एप्रिल ते ५ जून या कालावधीपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी १६.३५ वाजता सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ३.४५ वाजता पोहोचेल. ही १७ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.

वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

SCROLL FOR NEXT