Janshatabdi Express Spoiled Fruit Vending Case Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: प्रवाशांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा! जनशताब्दीमध्ये सडलेली फळं विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्याला रंगेहाथ पकडलं; कोकण रेल्वेची कारवाई

Janshatabdi Express Spoiled Fruit Vending Case: कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे आरोग्य, अन्नाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत धावत्या ट्रेनमध्ये एका अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध अत्यंत वेगवान आणि कडक कारवाई केली.

Manish Jadhav

Konkan Railway Action On Unauthorized Vendor: कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे आरोग्य, अन्नाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत धावत्या ट्रेनमध्ये एका अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध अत्यंत वेगवान आणि कडक कारवाई केली. मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या गाडी संख्या 12052 जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये 31 मे 2026 रोजी हा प्रकार उघडकीस आला. या ट्रेनमधील केटरिंग सेवांची जबाबदारी आयआरसीटीसी (IRCTC) कडे आहे. ट्रेनमध्ये फेरफटका मारत असताना एका व्यक्तीला प्रवाशांना सडलेली फळे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले.

संशय आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने जेव्हा या व्यक्तीची चौकशी आणि पडताळणी केली, तेव्हा त्याच्याकडे रेल्वेचे कोणतेही वैध ओळखपत्र किंवा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारानंतर रेल्वे नियमांनुसार तातडीने कारवाई करत त्या व्यक्तीला अनधिकृत विक्रीबद्दल दंड ठोठावण्यात आला आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी (Ratnagiri) येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन करण्यात आले.

या घटनेची गंभीर दखल घेत कोकण रेल्वेने गाड्यांमधील अनधिकृत विक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर व आरामदायी करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले. कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याद्वारे 31 मे पासून संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर 15 दिवसांची विशेष मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोकण रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कमधील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये अत्यंत कडक आणि सखोल तपासणी केली जात आहे. रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर या मोहिमेदरम्यान तात्काळ गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जात आहे.

या 15 दिवसांच्या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांचे हित जपणे हा आहे. ट्रेनमध्ये अनधिकृतपणे वस्तूंची विक्री करणे, प्रवाशांकडून छापील किमतीपेक्षा जास्त पैसे वसूल करणे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे यावर रेल्वेने लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा, स्वच्छता, प्रवाशांची सेवा आणि रेल्वेने ठरवून दिलेल्या दरांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले की, प्रवासादरम्यान जर कोणत्याही ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर अनधिकृत विक्री किंवा कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळल्यास, त्यांनी त्वरित रेल्वे प्राधिकरणाशी संपर्क साधून तक्रार करावी, जेणेकरुन अशा समाजकंटकांवर तात्काळ आणि योग्य ती कडक कारवाई करणे शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

SCROLL FOR NEXT