Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वेचा फुकट्यांना दणका; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 23.10 कोटी दंड वसूल

Konkan Railway Fines Ticketless Passengers: कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतली आहे. ९,७३१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ९,७३१ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने या कारवाईतून २३.१० कोटी इतका दंड वसूल केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम तब्बल १.७ कोटींनी अधिक आहे. कोकण रेल्वे मार्ग हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा महत्वाचा प्रवासी मार्ग आहे.

दरवर्षी लाखो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. मात्र, काही प्रवासी तिकीट न काढता फुकट प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाकडून बिनतिकीट प्रवाशांना कोणतीही सवलत न देता थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करूनही बिनतिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनानं दिला आहे.

कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यास व त्यांच्या प्रवासाचा सुरक्षिततेसाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. यासाठी विविध सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

मात्र, रेल्वेकडून उत्तम सेवा देण्यात येत असतानाही काही प्रवासी फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळून येत आहे. यामुळं कोकण रेल्वे मार्गावर नियमितपणे तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT