Konkan Railway Police caught mobile thieves Dainik Gomantak
गोवा

कोकण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

कोकण रेल्वे पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्याना अटक केली आहे. चोरट्यांकडून चोरलेले मोबाईल फोन आणि इतर काही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचं चित्र आहे. आता कोकण रेल्वे पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्याना अटक केली आहे. चोरट्यांकडून चोरलेले मोबाईल फोन आणि इतर काही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

(Konkan Railway Police caught mobile thieves)

दिनेश कुमार (27 रा. रुधौली बस्ती उत्तरप्रदेश) आणि सद्दाम शेख (25 रा. सोलापूर महाराष्ट्र) या दोन आरोपींना कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडील 15 हजार रुपयांचा सॅमसंग मोबाईल तसेच आणखी दोन फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व फोनची एकंदरीत किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे. याप्रकरणी कुमार रामण्णा यांनी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान मागच्याच आठवड्यात रेल्वेमधून प्रवास करत असताना एका महिलेची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून एकंदरीत 5.20 लाख ऐवज असलेले बॅग लंपास करण्यात आली होती. एका संशयिताला याप्रकरणी बेड्याही ठोकण्यात आल्या होत्या.

संबंधित महिला कोईम्बतूर एक्स्प्रेस मधून प्रवास करत होती. दुपारच्या वेळी 3.30 वाजता सोन्याच्या रिंग, सोनसाखळी, रोख रकमेसहित इतर मौल्यवान वस्तू असलेली तिची बॅग चोरण्यात आल्याची असल्याची माहिती पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आली आहे . या वस्तूंची एकंदरीत किंमत अंदाजे 5.20 लाख रुपये अशी असून एका अज्ञात व्यक्तीने या वस्तूंची चोरी केली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT