Konkan Railway update Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

Konkan Railway Inspection: कोकण रेल्वे व्यवस्थापनाने पावसाळ्यापूर्वी पायाभूत सुविधा व सुरक्षा यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी वार्षिक मान्सूनपूर्व तपासणी मोहीम सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: निसर्गरम्य परिसरातून धावणाऱ्या कोकण रेल्वेला पावसाळ्यात अनेक ऑपरेशनल आव्हानांना सामोरे जावे लागते. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उंच कडा, कटिंग्ज आणि उतार यामुळे पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन, सातत्यपूर्ण देखरेख आणि कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक ठरतात.

या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे व्यवस्थापनाने पावसाळ्यापूर्वी पायाभूत सुविधा व सुरक्षा यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी वार्षिक मान्सूनपूर्व तपासणी मोहीम सुरू केली आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणीदरम्यान विविध विभागांचे संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवेदनशील ठिकाणे, सुरू असलेली देखभाल कामे तसेच सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, १० मार्च रोजी मडगाव ते ठोकूर दरम्यानच्या रेल्वेमार्गाची तपासणी करण्यात आली, तर ११ मार्च रोजी मडगाव ते रोहा या मार्गाचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीदरम्यान रेल्वे ट्रॅक, पूल, बोगदे, कटिंग्ज, उतार, सिग्नलिंग प्रणाली, स्थानकांवरील पायाभूत सुविधा, पाणी साचण्याची शक्यता असलेली ठिकाणे तसेच सौर प्रकाश व्यवस्थेची तपशीलवार तपासणी करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रेल्वे नेटवर्क पूर्णपणे सज्ज राहावे यासाठी असुरक्षित ठिकाणे, सुरू असलेली देखभाल कामे आणि सुरक्षा व्यवस्थेचे मूल्यमापनही करण्यात आले.

एक सक्रिय पाऊल

कोकण रेल्वेचा मार्ग आणि अतिवृष्टी क्षेत्रातून जात असल्यामुळे ही वार्षिक तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. मान्सून काळात सुरक्षित रेल्वे सेवा देण्यासाठी ही मोहीम सक्रिय पाऊल असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT